जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग ; सहाजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:30+5:302021-05-08T04:25:30+5:30
इचलकरंजी : रात्रीच्यावेळी फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे तसेच विविध चौकांतून होणाऱ्या गर्दीच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग ; सहाजणांवर गुन्हा
इचलकरंजी : रात्रीच्यावेळी फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे तसेच विविध चौकांतून होणाऱ्या गर्दीच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी बीटमार्शल बाईकवरून प्रमुख मार्गांसह गल्लीबोळांतून फेरफटका मारत सहाजणांवर जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून या निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. दिवसभर विनाकारण फिरणाऱ्यांवर व नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. मात्र, रात्रीच्या वेळी अनेकजण विनाकारण तसेच विविध चौकांत एकत्र येऊन धिंगाणा घालत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. घटनास्थळी मोठे वाहन जात नसलेल्या ठिकाणी नवीन बीट मार्शल बाईक पोलिसांना दिली. त्याचा वापर करत पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.