शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कोल्हापूरच्या दिव्यांग विनम्रने पूर्ण केली ९९९९ पायऱ्यांची गिरनार यात्रा, महिनाभर केला खडतर सराव

By संदीप आडनाईक | Updated: July 25, 2022 12:59 IST

गिरनार पर्वताची यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणारा विनम्र हा स्पेशल चाईल्ड गटातील पहिलाच

संदीप आडनाईककोल्हापूर : गुजरात राज्यातील जुनागड (सौराष्ट्र)जिल्ह्यातील ९९९९ पायऱ्या असलेल्या गिरनार पर्वताची यात्रा कोल्हापूरच्या दिव्यांग तरुणाने पूर्ण केली आहे. शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारी ही यात्रा पूर्ण करणाऱ्या या विनम्र अनिल खटावकरचे कोल्हापुरात विशेष कौतुक होत आहे. वैशिष्ट्य म्हणजे गिरनार पर्वताची यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणारा विनम्र हा स्पेशल चाईल्ड गटातील पहिलाच आहे.हिमालयापेक्षाही जुना पर्वत समूह असलेल्या (रेवतक पर्वत) या गिरनार पर्वतावर श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवासस्थान आहे असे मानले जाते. श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान असलेल्या या पर्वतशिखरांच्या समूहाला श्रीगिरनार म्हणतात.कोल्हापुरातील जोतिबा परफेक्ट अँड सेफ ग्रुप (जे -पास ग्रुप) या ट्रेकिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ७१ स्त्री-पुरुष ट्रेकर्ससोबत शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिराचा विद्यार्थी, बौद्धिक अक्षम असलेल्या २५ वर्षीय विनम्र अनिल खटावकरने आईसोबत ही यात्रा १८ जुलै २०२२ रोजी यशस्वीपणे पूर्ण केली. श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे, तसेच् हजारो वर्षांपासून श्री दत्त महाराजांनी प्रज्वलित केलेल्या अग्नीचेही (दत्त अग्नी) त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतले.महिनाभर खडतर सरावही यात्रा पूर्ण करण्यासाठी विनम्र व त्याची आई विजया यांनी प्रशिक्षक अविनाश हावळ यांच्यासोबत रोज ३००० पायऱ्या चढण्याचा महिनाभर खडतर असा सराव केला. यापूर्वी विनम्रने कळसूबाई शिखर, हरिश्चंद्र गड, रांगणा किल्ला, पन्हाळा ते पावनखिंड असे ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. आता तो अमरनाथ आणि चारधाम यात्रा पूर्ण करणार आहे.केवळ चार तासांत यात्रा पूर्णविनम्रने ही यात्रा चार तासांत पूर्ण केली. पहाटे ३ वाजून ८ मिनिटांनी चढाईस सुरुवात केली आणि ते ७ वाजून १५ मिनिटांनी पर्वतावर पोहोचले. ११.१५ वाजता परतीचा प्रवास सुरू केला, नंतर आरामात चार वाजता खाली पोहोचले.

विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांनीही प्रयत्न केले पाहिजेत. विनम्रच्या आई-वडिलांनी जे प्रयत्न केले त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. चेतनाचे नाव उंचाविल्याबद्दल विनम्रचे विशेष अभिनंदन. -पवन खेबुडकर, कार्यकारी अध्यक्ष, चेतना अपंगमती विकास संस्था.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर