शहरातील नागरिक लसीसाठी गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:15+5:302021-05-12T04:24:15+5:30
आरोग्य केंद्रावर टोकन मिळालेल्या व्यक्ती, नंबर जाईल या भीतीने दिवसभर केंद्रावर उपाशीपोटी बसून राहिल्याने, त्याचा परिणाम वयोवृध्दांच्या आरोग्यावर होत ...

शहरातील नागरिक लसीसाठी गावाकडे
आरोग्य केंद्रावर टोकन मिळालेल्या व्यक्ती, नंबर जाईल या भीतीने दिवसभर केंद्रावर उपाशीपोटी बसून राहिल्याने, त्याचा परिणाम वयोवृध्दांच्या आरोग्यावर होत आहे. लसीसाठी खुली नोंदणी असल्याने कोणीही कुठेही जाऊन लसीकरण करू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागात लसीसाठी गर्दी दिसत आहे. एकीकडे कोरोना वाढत आहे, तर दुसरीकडे लसीचा तुठवडा आहे. तसेच आलेली लस वाटपात सुध्दा भेदभाव असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पहिल्या टप्प्यात लस दिलेल्यांना ३५ दिवसांत दुसरा डोस देणे गरजेचे आहे; परंतु लसीच्या तुटवड्यामुळे त्यात वाढ होऊन तो कालावधी दीड महिन्याचा करण्यात आला. त्यानंतर केंद्राला मिळणाऱ्या मोजक्या लसींमुळे दुसऱ्या लसीचा कालावधी संपलेले लोक वाट पाहत आहेत. तसेच प्रमाणपत्राच्या कारणावरून अनेकवेळा केंद्रावर गोंधळ होत आहे.