इचलकरंजी नदीवेस नाका परिसरात गावठी दारू अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:44+5:302021-02-23T04:36:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नदीवेस नाका परिसरात गावठी दारूविक्री खुलेआम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त ...

Village liquor den in Ichalkaranji Nadives Naka area | इचलकरंजी नदीवेस नाका परिसरात गावठी दारू अड्डे

इचलकरंजी नदीवेस नाका परिसरात गावठी दारू अड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नदीवेस नाका परिसरात गावठी दारूविक्री खुलेआम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी हे दारू अड्डे उद्ध्वस्त करावेत व विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. नदीवेस परिसरात असलेल्या लक्ष्मी मंदिर परिसरात दोन ठिकाणी राजरोसपणे गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. भरवस्तीमध्ये सुरू असलेल्या या गावठी दारू अड्ड्यांमुळे अनेक तळीराम याठिकाणी जमा होतात. दारू पिऊन धिंगाणा घालत उलटी करतात. अनेक जण रस्त्यावरच मद्यधुंद अवस्थेत पडतात. याचा त्रास ये-जा करणाऱ्या महिलांनाही होत आहे. याबाबत पोलिसांना कळवले असले तरी कारवाई होत नाही. उलट विक्रेते उद्धटपणे तक्रारदार नागरिकांना आमचे पोलिसांबरोबर ‘संबंध’ असतात. त्यामुळे आम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही, असे उर्मट उत्तर देतात. त्याठिकाणी पोलिसांची गाडी जाऊन येते; पण कारवाई होत नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे लागेबांधे असल्याचे नागरिकांना स्पष्ट होत आहे. याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन दारू अड्डे उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Village liquor den in Ichalkaranji Nadives Naka area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.