शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- गर्भलिंग निदान प्रकरणातील गोळ्यांचा पुरवठादार विजय पाटील अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:23 IST

दोन दिवसांची पोलिस कोठडी, आणखी काही संशयित रडारवर

कोल्हापूर : बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी विजय सुनील पाटील (वय २५, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) याला रविवारी (दि. २२) अटक केली. पाटील याने बोगस डॉक्टर दगडू पाटील याला गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केला होता. विजय पाटील हा एका औषध वितरण कंपनीकडे औषध पुरवठा प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम करीत होता, अशी माहिती चौकशीत समोर आली. त्याला गोळ्या पुरवणाऱ्या वितरकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.फुलेवाडी आणि जोतिबा डोंगर येथील प्रतीक्षा क्लिनिकमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत आरोग्य विभागाच्या पथकाला गर्भपाताच्या गोळ्या सापडल्या होत्या. तसेच, जुना बुधवार पेठेतील ढिसाळ गल्ली येथे धन्वंतरी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत मोबाइल सोनोग्राफी मशीन सापडले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना बोगस डॉक्टर पाटील याच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा विजय पाटील याची माहिती मिळाली.पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले होते. त्यानेच गोळ्यांची विक्री केल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या टोळीतील आणखी काही संशयित रडारवर असून, त्यांनाही लवकरच अटक होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.एमआरचे कनेक्शनअटकेतील पाटील हा गेल्या तीन-चार वर्षांपासून एका औषध वितरक कंपनीकडे एमआर म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याला गर्भपाताच्या गाेळ्या कुठे मिळतात, याची माहिती होती. काही महिन्यांपूर्वी तो अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीत सामील झाला. त्यानेच बोगस डॉक्टरला गोळ्या पुरवल्या. त्याने कोणत्या वितरकाकडून गोळ्या मिळवल्या?, किती पाकिटे खरेदी केली होती?, किती रुपयांना त्याची विक्री केली?, आणखी कोणत्या डॉक्टरांना तो गोळ्यांची विक्री करीत होता? याचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPregnancyप्रेग्नंसीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस