Vidhan Parishad Election : अमल महाडिक उद्या अर्ज भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 13:42 IST2021-11-21T13:42:17+5:302021-11-21T13:42:47+5:30
कोल्हापूर : माजी आमदार अमल महाडिक हे उद्या सोमवारी सकाळी ११ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे ...

Vidhan Parishad Election : अमल महाडिक उद्या अर्ज भरणार
कोल्हापूर : माजी आमदार अमल महाडिक हे उद्या सोमवारी सकाळी ११ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ही माहिती दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये महाडिक हे अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी आज रविवारी नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारीच प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी महाडिक यांना सोबत घेऊन इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, कुरूंदवाड असा दाैरा केला होता. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला असून महाडिक यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना आणखी वेग येणार आहे.