शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'माझा साहेब खरा हाय', धाड पडल्यानंतर मुश्रीफांच्या घराबाहेर वृद्ध महिलेचा टाहो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 18:15 IST

मुश्रीफ यांच्या घरावर छापा पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर मोठी गर्दी केली आहे.

कोल्हापूर - कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकल्या. तब्बल पंधरा जणांचे पथक त्यांच्या घरातील विविध कागदपत्रांची माहिती घेत होते. मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडल्याचं समजताच मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. मोठ्या जल्लोषात मुश्रीफ यांचे समर्थन करत घराबाहेर बोलावून त्यांचा सत्कारही केला. 

मुश्रीफ यांच्या घरावर छापा पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफ यांच्या घरासह त्यांचा माद्याळ ता. कागल येथील खासगी साखर कारखाना, त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर व टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली. आपल्या नेत्याच्या घरावर पडलेली धाडीची बातमी समजतात भावूक होऊन कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांचे घर गाठले. विशेष म्हणजे, या गर्दीत दोन वृद्ध महिलाही आल्याचं पाहायला मिळालं. मुश्रीफ यांच्या घराबाहेर आलेल्या या दोन्ही महिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तर, एक महिला मोठ-मोठ्यानं माझा साहेब देव आहे, माझा साहेब खरा माणूस हाय. मी आजारीय तरीभी इकडं आलीय, असे म्हणत या महिल्या रडत होत्या. मुश्रीफ यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.व्हिडीओ -दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी भाजपा प्रदेध्याध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याची जाहीर समारंभात ऑफर दिली होती. पण, त्यांनी त्यास नकार देऊन शरद पवार हेच आपला देव असल्याचे सांगून कर्नाटकात एकेक आमदाराला खरेदी करण्यासाठी ७० कोटी रुपये भाजपाने दिले असून, हा पैसा आला कोठून अशी विचारणा केली होती. त्याचा परिणाम म्हणूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयIncome Taxइन्कम टॅक्स