माजी नगरसेवक अनिल आवळे कोरोनाचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:07+5:302021-05-09T04:24:07+5:30
कोल्हापूर : महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल यादोबा आवळे यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. काेराेनाची लागण झाल्यामुळे चार दिवसांपासून त्यांच्यावर ...

माजी नगरसेवक अनिल आवळे कोरोनाचे बळी
कोल्हापूर : महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल यादोबा आवळे यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. काेराेनाची लागण झाल्यामुळे चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते; पण दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५२ व्या वर्षीच एक्झिट घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका रेखा, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
आवळे हे २००५ ते २०१० या काळात भोसलेवाडी-कदमवाडी या प्रभागांतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांची पत्नी रेखा आवळे यादेखील नगरसेविका होत्या. आवळे यांनी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वीकृत संचालक म्हणूनही काम केले होते. सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा आवळे यांचा स्वभाव होता. त्यामुळे शनिवारी त्यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून गेली.
फोटो : ०८०५२०२१-कोल- अनिल आवळे निधन