कोल्हापूर : रात्री अकरापासून सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केली असली तरी कोल्हापुरात मात्र याची सोयीने अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र आहे. चौकाचौकांत पोलीस आहेत पण त्यांच्यासमोरूनच वाहनांची ये-जा सुरू आहे.दोन दिवसांपूर्वीपासून रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे; परंतु गेल्या काही महिन्यांत रात्री बारा, साडेबारापर्यंत वाहतुकीची पडलेली नागरिकांची सवय अजून मोडेनाशी झाली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शहरात फेरफटका मारला असताना वाहने सुसाटपणे रस्त्यावरून ये-जा करत होती.दसरा चौकात पोलीस व्हॅन लावून पोलीस उभे होते; परंतु वाहनधारकांना फारसे विचारले जात नव्हते. गंगावेश चौक, बिंदू चौक या ठिकाणीही हीच परिस्थिती होती. केवळ महाराणा प्रताप चौकामध्ये मात्र वाहनचालकांना पोलीस हटकत होते.
कोल्हापुरात रात्री अकरानंतरही वाहने रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:05 IST
CoronaVirus Kolhapur- रात्री अकरापासून सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केली असली तरी कोल्हापुरात मात्र याची सोयीने अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र आहे. चौकाचौकांत पोलीस आहेत पण त्यांच्यासमोरूनच वाहनांची ये-जा सुरू आहे.
कोल्हापुरात रात्री अकरानंतरही वाहने रस्त्यावर
ठळक मुद्दे कोल्हापुरात रात्री अकरानंतरही वाहने रस्त्यावरचौकाचौकांत पोलीस, पण त्यांच्यासमोरूनच वाहनांची ये-जा सुरू