वाहनाच्या धडकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST2020-12-05T05:02:59+5:302020-12-05T05:02:59+5:30
कागल : कागल- निढोरी रस्त्यावर गोरंबे फाट्यानजीक शेताकडे चालत जात असलेल्या शेतकऱ्यास अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने वृद्ध शेतकऱ्याचा ...

वाहनाच्या धडकेत
कागल : कागल- निढोरी रस्त्यावर गोरंबे फाट्यानजीक शेताकडे चालत जात असलेल्या शेतकऱ्यास अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. गणपती सिद्ध पसारे (वय ६५, रा. गोरंबे, ता. कागल) असे त्यांचे नाव आहे.
गणपती पसारे हे रोज जंगली महाराज मठाजवळ आपल्या शेताकडे चालत जात असत. शुक्रवारी सकाळी आठ वाजता ते जात असताना पाठीमागून आलेल्या एका वाहनाने त्यांना ठोकर दिली. त्यात त्यांच्या डोक्यास मार बसला. गावातील लोकांनी त्यांना एका दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर कागलला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मुलगा संभाजी पसारे यांनी कागल पोलिसांत वर्दी दिली आहे. अज्ञात वाहन आणि वाहनचालकाविरुद्ध कागल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.