शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

वसुंधरा चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव, वसुंधरा मित्र पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:46 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्याबरोबरच निसर्ग व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची पावले उचलली होती. त्यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यावेळी राजे होते, आता प्रशासन आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. त्यासाठी सर्वांच्या कृतिशील पुढाकाराची गरज आहे, असे प्रतिपादन गुरुवारी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.

ठळक मुद्देवसुंधरा चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव, वसुंधरा मित्र पुरस्कार वितरणपर्यावरण संवर्धनासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज : संयोगिताराजे छत्रपती

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्याबरोबरच निसर्ग व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची पावले उचलली होती. त्यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यावेळी राजे होते, आता प्रशासन आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. त्यासाठी सर्वांच्या कृतिशील पुढाकाराची गरज आहे, असे प्रतिपादन गुरुवारी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.शाहू स्मारक भवनात आयोजित १० व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव व वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर आर. आर. देशपांडे, वीरेंद्र चित्राव, धीरज जाधव, शुभम चेचर, ऋतू काशीद उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. एस. व्ही. शिरोळ, डॉ. दीपक भोसले, महादेव नरके यांना वसुंधरा गौरव व छायाचित्रकार तय्यब अली, चिदंबर चिमणे व रॉबिनहूड आर्मी या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.संयोगिताराजे म्हणाल्या, संस्थानकाळात राजेंचा शब्द प्रमाण मानून नागरिकांनी निसर्ग संवर्धनासाठीचे नियम पाळले. आता मात्र वर्षानुवर्षे प्रबोधन केले तरी अपेक्षित परिणाम होत नाही. त्यामुळेच काही वेळा कठोर पावले उचलावी लागतात. विशाळगडाजवळ आम्ही शिवारण्य नावाचं जंगल वसवलं आहे. एकेकाळी एकच झाड असलेल्या जमिनीवर आता दाट वनराई आहे. सर्व प्रकारचे वन्यजीव येथे येतात. प्लास्टिकच्या पिशव्यांना आम्ही कापडी पिशव्यांचा पर्याय दिला. आमच्या पातळीवर अनेक लहान-मोठी पावलं उचलत आहोत. त्याला सर्वांच्या साथीची आवश्यकता आहे.महादेव नरके, चिदंबर चिमणे यांनी मनोगत व्यक्त केले. उदय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महोत्सवात गुरुवारी सकाळी कात्यायनी मंदिर परिसरात हेरिटेज वॉक करण्यात आला.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर