शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

असा बदलणार कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:33 IST

जुन्या हेरिटेज वास्तूचे जतन केले जाणार काय याबाबत कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली नाही

कोल्हापूर : कोल्हापूररेल्वे स्थानकासाठी आलेल्या निधीच्या कामातून त्याचा चेहरामोहरा संपूर्णपणे बदलून जाणार आहे. कामे जरी सुरू झाली असली तरी परीख पूल, पादचारी मार्ग, दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी जनता बझारपर्यंतचा ओव्हर ब्रीज, स्थानकाचे सौंदर्यीकरण, जुन्या हेरिटेज वास्तूचे जतन केले जाणार काय याबाबत कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली नाही.अमृत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या या कामातून विविध कामे होणार आहेत. त्यात सीबीएस स्थानक ते राजारामपुरी पादचारी पूल तसेच ओव्हर ब्रीजचा प्रश्न मार्गी लावणे बाकी आहे. फ्लॅटफॉर्म क्रमांक दोनकडून चारकडे जाण्यासाठी ब्रीज आणि इलेव्हेटर तसेच लिफ्टच्या कामाचाही समावेश आहे.सध्या जेथे रेल्वे कर्मचाऱ्यांची इमारत आहे, ती पाडून मुख्य प्रवेशद्वार आणि तिकीट बुकिंग खिडकी, प्रतीक्षालय उभारण्यात येत आहे. सध्या जुन्या हेरिटेज वास्तू असलेल्या तिकीट खिडकीच्या दुरुस्तीचाही समावेश यात आहे. या जागेत कबुतरांच्या विष्ठा आणि जुन्या पद्धतीची कौले आहेत. पावसाळ्यात ही जागा गळत असल्याने त्याचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे.नियोजित कामांचे ठळक मुद्दे

  • स्टेशनचा दर्शनी भाग सुधारणे.
  • बुकिंग काउंटर आणि एटीव्हीएमच्या तरतुदीसह नवीन मोठ्या झाकलेल्या पोर्टिकोची तरतूद.
  • पोर्टिकोअंतर्गत जुने बुकिंग काउंटर बदलून नव्या बुकिंग ऑफिसचे प्रवेश लॉबीमध्ये रूपांतर
  • रूफ प्लाझासह १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजची तरतूद
  • दोन्ही प्रवेशाच्या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र बंदिस्त पार्किंग.
  • रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, पादचारी मार्गांसह परिभ्रमण क्षेत्राचा विकास.
  • विद्यमान वेटिंग रूम, व्हीआयपी रूम, एंट्रन्स लॉबी इत्यादींचे नूतनीकरण.
  • २ एस्केलेटर आणि २ लिफ्टची तरतूद.
  • दिव्यांगजन अनुकूल सुविधांची तरतूद.
  • पृष्ठभागाच्या सुधारणेसह संपूर्ण कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मची तरतूद.
  • नवीन सुधारित टॉयलेट ब्लॉक्स आणि वॉटर बूथची तरतूद.
  • नवीन फर्निचरच्या तरतुदीसह प्लॅटफॉर्म आणि प्रतीक्षा क्षेत्रांवर आसन क्षमता वाढवणे.
  • विद्यमान इमारतीच्या छतावरील उपचार.
  • परिभ्रमण क्षेत्र, प्रतीक्षालय, प्लॅटफॉर्म इत्यादीवर रोषणाई.
  • विविध ठिकाणी डस्टबिनची तरतूद.
  • लँडस्केपिंग, रस्ता, पादचारी मार्गांसह परिभ्रमण क्षेत्राचा विकास आणि दुसऱ्या प्रवेशावर पार्किंग सुविधा

कोल्हापूरचे रेल्वेस्थानक हेरिटेजमध्ये असले तरी मात्र संरक्षितस्थळांच्या यादीत ते दिसत नाही. याठिकाणी शाहू महाराजांचे उचित स्मारक होणे गरजेचे आहे. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे