खजुराचे प्रकार अनेक

By Admin | Updated: June 30, 2014 00:43 IST2014-06-30T00:43:05+5:302014-06-30T00:43:45+5:30

कोल्हापूरकरांना लागतो दरमहा दहा टन खजूर : ७० रुपयांपासून १२५० रुपये प्रतिकिलो मिळतो खजूर

Various types of palm | खजुराचे प्रकार अनेक

खजुराचे प्रकार अनेक

सचिन भोसले ल्ल कोल्हापूर
खजूर म्हटले की, रमजान रोजे आणि नवरात्रातील उपवासांची आठवण होते. या खजुरांमध्ये आपल्याला ‘जायदी’ खजूरच माहीत आहे. मात्र, कोल्हापूरच्या बाजारात खजुराचे दहापेक्षा अधिक प्रकार येतात. विशेष म्हणजे इराण, इराक, ट्युनिशिया या देशांतून थेट कोल्हापूरच्या बाजारात खजूर विक्रीसाठी येतो. विशेष बाब म्हणजे या खजुराची किंमतही अगदी ७० रुपये किलोपासून १२५० रुपये किलोपर्यंत आहे. रमजान रोजेकरिता खजुराची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. साधारणत: कोल्हापूरसाठी केवळ रमजान महिना गृहीत धरल्यास ४० टन इतका खजूर लागतो, तर नवरात्रामध्ये १५० टन इतकी आवक व विक्रीही होते. याचबरोबर महिन्याला सर्वसाधारणपणे दहा टन खजूर लागतो. असा हा खजूर कसा आहे ते जाणून घेऊ ‘लोकमत’संगे.
प्रामुख्याने आखाती देशांमध्ये खजूर पिकविला जातो. या झाडांची उंची साधारणत: २१ ते २३ मीटर इतकी उंच असते. प्रत्येक खजुरामध्ये २० ते ७० कॅलरिज असू शकतात. असा हा खजूर अर्थात इंग्रजीमध्ये याला ‘ड्याकटीलीफेरा’ व ‘डेटस’ असेही संबोधले जाते. प्रामुख्याने खजुरामध्ये ‘बरही, हलवे, खादके, मेडजाल, जायदी, फरद, आजव्हा, अल्बराक, अमीर हज, बराकवाई, खलाशह, रजश्तावी, मिशरीक, मदिनाथ, मॅक्झूल, मरियम, मझाहपती, मॅजेस्टिक, तर डेरी, डेगलेट, नूर, झडी या मध्यम सुक्यामधील प्रमुख जाती आहेत. याचबरोबर युरी जातीचा सुका खजूरही पिकविला जातो. विशेष म्हणजे हे सर्व खजूर आता कोल्हापूरच्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ‘मेडजोल’ हा सर्वांत महागडा खजूरही कोल्हापूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याचा दर १२५० रुपये प्रतिकिलो इतका आहे.

Web Title: Various types of palm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.