शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून विविध अभ्यासक्रम -उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:53 IST

Shivaji University, Education Sector, kolhapur, belgaon, udaysamant, minister सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ संचलित असणारे शैक्षणिक संकुल चंदगड तालुक्यातील शिनोळी-तुडये दरम्यान सुरू केले जाईल. या संकुलाच्या माध्यमातून जानेवारीपासून कौशल्य विकासाला बळ देणारे रोजगाराभिमुख विविध पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून विविध अभ्यासक्रम -उदय सामंतअंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दक्षता घेण्याची सूचना

 कोल्हापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ संचलित असणारे शैक्षणिक संकुल चंदगड तालुक्यातील शिनोळी-तुडये दरम्यान सुरू केले जाईल. या संकुलाच्या माध्यमातून जानेवारीपासून कौशल्य विकासाला बळ देणारे रोजगाराभिमुख विविध पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.शिनोळी एमआयडीसीतील एका कंपनीची पाच एकर जागा आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली असून, ती पाच वर्षांच्या भाडेतत्त्वावर उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी लवकरच तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक संकुलाचा प्रारंभ करण्यात येईल. या संकुलाला कायमस्वरूपी तुड्ये येथील दहा एकर शासकीय जागा मिळवून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे.

अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक सामंजस्य करार करण्याची विद्यापीठाला सूचना केली आहे. सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीसह अन्य संघटनांसमवेतही चर्चा करून त्यांना अभिप्रेत असणारे अभ्यासक्रम सुरू केले जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, आढावा बैठकीत खासदार संजय मंडलिक यांनी अभ्यासक्रम सुरू करण्याबाब सीमाभागातील नागरिक, विविध संघटनांसमवेत चर्चा करावी असे सुचविले. आढावा बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आदी उपस्थित होते.अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दक्षता घेण्याची सूचनासोलापूर, मुंबई, गोंडवाना विद्यापीठातील प्रकार लक्षात शिवाजी विद्यापीठाला अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत दक्षता घेण्याची सूचना केली आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या चर्चा केली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी बैठक घेतील. कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा होतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShivaji Universityशिवाजी विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव