संजय मंडलिक यांच्या वाढदिवसदिनी विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:20 IST2021-04-14T04:20:53+5:302021-04-14T04:20:53+5:30

नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रा. मंडलिक हे तरुणांना प्रेरणा देणार नेतृत्व असल्याचे सांगून जिल्ह्यामध्ये विविध कामांसाठी त्यांनी कोट्यवधींचा निधी ...

Various activities on Sanjay Mandlik's birthday | संजय मंडलिक यांच्या वाढदिवसदिनी विविध उपक्रम

संजय मंडलिक यांच्या वाढदिवसदिनी विविध उपक्रम

नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रा. मंडलिक हे तरुणांना प्रेरणा देणार नेतृत्व असल्याचे सांगून जिल्ह्यामध्ये विविध कामांसाठी त्यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे. शिवाय कोल्हापुरातील विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवरील विविध समस्या सोडवण्यासाठी ते युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मुरगूड शहरात विकासकामाचे जे पर्व सुरू आहे त्यामध्ये प्रा. मंडलिक यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उत्साह देणारा ठरला आहे, असेही सांगितले. कागल, हमीदवाडा, गारगोटी आदी ठिकाणीही मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनीही मनोगत व्यक्त केले.

नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जयसिंग भोसले, सुहास खराडे, राजेंद्र भाट, दीपक शिंदे, अमर सनगर, मारुती कांबळे, आनंदा मांगले, दत्तात्रय मंडलिक, भगवान लोकरे, अक्षय शिंदे, सचिन मेंडके, सुनील रणवरे, बबन बारदेस्कर, राजू कांबळे, विजय मोरबाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

१३ मुरगूड

फोटो ओळ

मुरगूड, ता. कागल येथे खासदार संजय मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना नगराध्यक्ष राजेखान जमादार, नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, दीपक शिंदे, राजू भाट, मारुती कांबळे, भगवान लोकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Various activities on Sanjay Mandlik's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.