हरित व स्वच्छ ऊर्जाविषयक विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:39+5:302021-01-25T04:23:39+5:30
कोल्हापूर : पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या माध्यमातून संरक्षण क्षमता महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

हरित व स्वच्छ ऊर्जाविषयक विविध उपक्रम
कोल्हापूर : पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या माध्यमातून संरक्षण क्षमता महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे विभागीय सहायक विक्री व्यवस्थापक मनोज गुप्ता म्हणाले, यानिमित्ताने दहा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन ऑइल कार्पोरेशनचे किरकोळ विक्री विभागाचे सहा. व्यवस्थापक चंदरभान नंदनकर म्हणाले, यानिमित्ताने ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पोलीस मैदानावरून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियमचे सहा. विक्री व्यवस्थापक हर्षद कुंभार म्हणाले, यानिमित्ताने पेट्रोल, डिझेल पंपावरील स्वच्छतेकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्यात येणार आहे. यावेळी स्मित कोठारी, तुषार चव्हाण उपस्थित होते.