इंजिनिअरिंगमधून करिअरसाठी वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:37+5:302021-02-05T07:00:37+5:30

जयसिंगपूर : कोरोनामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढून सर्व जग जवळ आले आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करण्यासाठी अधिकाधिक ...

Variety for career from engineering | इंजिनिअरिंगमधून करिअरसाठी वाव

इंजिनिअरिंगमधून करिअरसाठी वाव

जयसिंगपूर : कोरोनामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढून सर्व जग जवळ आले आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करण्यासाठी अधिकाधिक वाव उपलब्ध झाला आहे. या महाविद्यालयात असलेल्या चांगल्या सोयी-सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांनी स्वत:चा संपूर्ण विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सहायक अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांनी केले.

येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथमवर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात मिरजकर बोलत होते. प्र. प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. स्वागत प्रा. एम. बी. भिलवडे यांनी केले. प्रा. पी. पी. पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. एस. एम. अत्तार यांनी केले, तर ए. बी. घोलप यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम, उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम यांचे प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमास डॉ. पी. आर. कुलकर्णी, प्रा. ए. एस. साजने, डॉ. जे. एस. लंबे, प्रा. एस. एम. शेख, डॉ. डी. बी. उंडे, डॉ. डी. बी. देसाई, प्रा. बी. एन. शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - ०१०२२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ -

जयसिंगपूर येथील जे. जे. मगदूम अभियांत्रिकीमध्ये आयोजित कार्यक्रमात सहायक अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Variety for career from engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.