शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

कोल्हापूरात ‘वारी लाल परीची’, एस.टी.च्या इतिहास पाहण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 2:19 PM

एस.टी.च्या स्थापनेपासून अर्थात १९४८ पासूनचा प्रवास एकाच छताखाली तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लाल परीची’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कोल्हापूरात सोमवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशी दत्तात्रय खोडके, मंगला खोडके यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूरात ‘वारी लाल परीची’एस.टी.च्या इतिहास पाहण्यासाठी गर्दी

कोल्हापूर : एस.टी.च्या स्थापनेपासून अर्थात १९४८ पासूनचा प्रवास एकाच छताखाली तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लाल परीची’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कोल्हापूरात सोमवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशी दत्तात्रय खोडके, मंगला खोडके यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवासी, नागरिक यांच्यासह एस.टी. कामगारांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. एस. टी. बसची विविध मॉडेल्स, एस. टी.चा इतिहास, विविध योजनांची माहिती, प्रवाशांचे रंजक अनुभव अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात फोटो व वस्तंूच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रातील प्रमुख बसस्थानकांवरील एस. टी.प्रेमी संघटना आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यातर्फे ‘एस. टी. विश्व’ हे फिरते प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात १९४८ पासून अर्थात एस.टी.च्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या विविध स्थित्यंतरांचे दर्शन प्रवाशांना होणार आहे.

एस. टी. बसची विविध मॉडेल्स, एस. टी.चा इतिहास, विविध योजनांची माहिती, प्रवाशांचे रंजक अनुभव अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात फोटो व वस्तंूच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे. याप्रसंगी ज्युनिअर आगार व्यवस्थापक दयानंद पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव, कामगार अधिकारी मनिषा पवार यांच्यासह अधिकारी, कामगार व प्रवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकवाहिनी असलेल्या एस.टीने मागील काही वर्षात स्वत:मध्ये आमूलाग्र बदल केल आहेत. एक नवीन रुप एस.टीने परीधान केले आहे. आजच्या युगाच्या आधुनिक लाल परीची इतिहास या प्रर्दशनातून पाहण्यास मिळतो. सर्वांसाठी मोफत खुले असून यांचा लाभ प्रवाशांनी घ्यावी.- अजय पाटील, आगार व्यवस्थापक कोल्हापूर

सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रदर्शन पाहण्याची संधी

  1.  गडहिंग्लज : २५ जून
  2. इचलकरंजी : २६ जून
  3. सांगली : २१ जून

 

 

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर