शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Valentine Day 2018 :प्रेमाचे नाते होणार अधिक दृढ, कोल्हापुरात जय्यत तयारी; सामाजिक कार्याची झालर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 19:51 IST

प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. काही युवकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सामाजिक कार्याची झालर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

ठळक मुद्देप्रेमाचे नाते आज होणार अधिक दृढकोल्हापुरात जय्यत तयारी सामाजिक कार्याची झालर

कोल्हापूर : प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. काही युवकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सामाजिक कार्याची झालर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.पाश्चिमात्य संस्कृतीतील सण म्हणून ओळखला जाणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ आता भारतीय संस्कृतीत अन्य सणांप्रमाणे या दिवसाचीही जय्यत तयारी केली जाते. तरुणाईत फुलणारे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून या दिवसाचे औत्सुक्य अधिक आहे.

इतकेच नव्हे तर पती-पत्नी, भाऊ-बहीण या कौटुंबिक नात्यांचे रंग अधिक गहिरे करणारा दिवस म्हणूनही या ‘व्हॅलेंटाईन डे’ने घराघरांत आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच अवघ्या काही तासावर आलेल्या या गुलाबी दिवसाची लगबग सर्व महाविद्यालय, प्रमुख बाजारपेठांमध्ये दिसून येते आहे.

भेटवस्तू खरेदीसाठी गर्दी....शहरातील भेटवस्तूंच्या दुकानातील अनेकविध प्रकारातील वस्तूंनी ग्राहकांचे मन आकर्षून घेतले आहे. मराठीसह इंग्रजीत लिहिलेले प्रेमाचे शब्द असलेले आकर्षक संगीत वाजणारे ग्रिटींग, वेगवेगळ््या आकारातले टेडी बेअर, परफ्युम्सचे कॉम्बी पॅक अशा अनेकविध वस्तू बाजारात आल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला या वस्तूंची खरेदी व गुलाबाचे फुल खरेदी करण्यासाठी युवक-युवतींची गर्दी झाली होती.

सामाजिक झालर...प्रेमाचा संदेश देणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सामाजिक कार्याची झालर देत. आवडत्या व्यक्तींवर प्रेम कराच, पण रक्ताची नाती जोडा, असा संदेश युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यासह अन्याथ आश्रम, वृध्दाश्रम यांच्या सोबत हा दिवस साजरा करण्याचे काही युवा ग्रुपच्यावतीने नियोजन केले आहे.

सेल...सेल....प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी युवक - युवती नवीन कपडे खरेदी करण्याचा क्रेझ सध्या वाढत आहे. ग्राहकांना आकर्षत करण्यासाठी अनेक कपडे विक्रेत्यांनी विशेष व्हेलेंटाईन डे सेलचे नियोजन केले आहे. तसेच अनेक हॉटेलमध्ये पार्टीसह विशेष मेनू तयार करण्यात आला आहे.

युवा आॅर्गनायझेशनतर्फे रक्तदानयुवा आॅर्गनायझेशन व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी राजारामपुरी पहिली गल्ली उद्यान येथे बुधवारी सकाळी ८ ते सांयकाळी ७ पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. गेली अकरा वर्षापासून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येते.

यावर्षी ५०० पेक्षाजास्त रक्ताचे संकलन करणेचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा आॅर्गनायझेशन मंदार तपकिरे, सोनल शिर्के, विक्रम आंबले, अनिकेत कोरगांवकर, मुकुल शहा, सत्यजित जाधव, अवधूत भोसले यांनी केले आहे.

 

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेkolhapurकोल्हापूर