Boyfriend to rent Valentine's Day to celebrate! | व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने मिळतोय बॉयफ्रेंड!
व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने मिळतोय बॉयफ्रेंड!

गुरुग्राम - आजच्या जमान्यात पैसे टाकले की कुठलीही वस्तू समोर हजर होणे सहजशक्य झाले आहे. त्यात सध्या व्हॅलेंटाइन डे ची धामधूम सुरू असल्याने गिफ्ट कार्ड्स इत्यादींनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र भारतातील एका शहरात चक्क एकट्या मुलींसाठी भाड्याने बॉयफ्रेंड मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुग्राम येथील एका व्यावसायिकाने सिंगल मुलींसाठी स्वत: भाड्याने बॉयफ्रेंड बनू शकतो अशी ऑफर दिली आहे. शकूल गुप्ता नावाच्या या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट लिहून मुलींसाठी विविध प्रकारसच्या ऑफर्स दिल्या आहेत.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, शकूल याने आपल्या पॅकेजमध्ये मुलींसाठी दिलेल्या ऑफर्समध्ये विविध बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये ऑडी राइडपासून हात पकडण्यापर्यंतचे पर्यात देण्यात आले आहेत. पण त्यासाठी काही अटीही या व्यक्तीने घातल्या आहेत. बॉयफ्रेंड बनल्यानंतर संबंधित मुलीसोबत फॅशनसंदर्भात चर्चा करणार नाही, तसेच तिच्यासाठी झुरळांना पळवणार नाही, अशा गमतीशीर या अटी आहेत. 
 
फेसबूकवर शकूलवे आपली काही छायाचित्रे सुद्धा पोस्ट केली आहेत. गमतीशीर बाब म्हणजे तो कोणत्याही प्रकारचे जेवणकरून मुलींना खाऊ घालू शकतो, असेही शकूलने म्हटले आहे. मात्र आपण सी फूड खाणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे. शकूलची ही फेसबूक पोस्ट आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केली आहे. 


Web Title: Boyfriend to rent Valentine's Day to celebrate!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.