शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : वाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व  : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:52 IST

केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली.

ठळक मुद्देवाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व  : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा

कोल्हापूर : केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली.भाजपच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी वाजपेयी यांनाश्रध्दांजली वाहण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. वाजपेयी यांच्या आठवणी जागवत पाटील म्हणाले, सच्चा कार्यकर्ता कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे वाजपेयी. सातत्याने समाजाचा, देशाचा आणि विश्वकल्याणाचा विचार त्यांच्या मनामध्ये असे.पंचगंगा बँकेचे चेअरमन राजाराम शिपुगडे म्हणाले, समरसता परिषदेसाठी आलेल्या वाजपेयी यांना कोल्हापुरात विरोध झाला. मात्र त्याच सभेत त्यांनी इंदिरा गांधी यांचा गौरव करता पक्षीय मतभेत बाजुला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले.

आमदार अमल महाडिक म्हणाले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली आहे. सुभाष वोरा म्हणाले, तरूण, तडफदार वाजपेयी आम्ही पाहिले आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहणे ही दुर्देवी वेळ आहे. कोणताही बडेजाव नसणारा असा हा नेता प्रेरणादायी होता.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, प्र. द. गणपुले, महापालिकेतील गटनेते विजय सुर्यवंशी, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष आशिष ढवळे, आर. डी. पाटील, माणिक पाटील, जयश्री जाधव,राहूल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले.

चंद्रकांत यह तो मयनगरी हैपालकमंत्री पाटील म्हणाले, आजच जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सभेचा फोटो मला पाठवण्यात आला आहे. मी अखिल भारतीय संघटन मंत्री असल्याने वाजपेयी यांच्यासोबत व्यासपीठावर होतो. यानंतर बऱ्याच वर्षांनी मुंबईजवळच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उद्घाटनासाठी आलेल्या वाजपेयी यांनी प्रबोधिनी फिरून पाहिल्यानंतर, ‘चंद्रकांत, यह तो मयनगरी है’ असे उद्गार काढले होते अशी आठवण पाटील यांनी सांगितली.

दोन महिन्यांपूर्वी घेतली होती भेटमी आणि मुख्यमंत्री दोन महिन्यांपूवीं दिल्लीला गेलो होतो. तेव्हा वाजपेयी यांना भेटण्यासाठी गेलो होते. त्यावेळी त्यांच्या कानात परिचितांनी सांगितले की, गंगाधरपंत का चिरंजीव आया है, अब सीएम बन गए है. चंद्रकांत आए है. परंतू दुर्देवाने अटलजींना यातील काहीही कळत नव्हते अशी आठवणही पाटील यांनी सांगितली.

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील