पन्हाळा पंचायत समितीच्या सभापदीपदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वैशाली पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:38+5:302021-06-23T04:16:38+5:30
पन्हाळा पंचायत समितीत बारापैकी आठ सदस्य हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे असून पंचायत समितीवर या पक्षाची एकहाती सत्ता आहे. पहिल्या ...

पन्हाळा पंचायत समितीच्या सभापदीपदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वैशाली पाटील
पन्हाळा पंचायत समितीत बारापैकी आठ सदस्य हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे असून पंचायत समितीवर या पक्षाची एकहाती सत्ता आहे.
पहिल्या सव्वा वर्षासाठी पृथ्वीराज सरनोबत यांची त्यानंतर अनिल कंदुरकर यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी पन्हाळा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने गीतादेवी पाटील यांची निवड झाली त्यांच्या कार्यकालानंतर तेजस्विनी शिंदे यांची व वैशाली पाटील तर उपसभापती रश्मी कांबळे कायम राहिल्या सभापतीपदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डाॕॅ. विनय कोरे यांनी वैशाली पाटील व उपसभापतीपदासाठी रश्मी कांबळे यांचे नाव निश्चित केले. यावेळी गीतादेवी पाटील, अनिल कंदूरकर, संजय माने, पृथ्वीराज सरनोबत, प्रकाश पाटील, रवींद्र चौगले, पांडुरंग खाटकी, वैशाली पाटील, रेखा बोगरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वैशाली पाटील व रश्मी कांबळे यांनी या निवडी बिनविरोध केल्याबद्दल सर्व पंचायत समितीच्या सदस्याचे विशेष आभार मानले.
फोटो १) सभापती वैशाली पाटील