महाराष्ट्रदिनी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:34+5:302021-05-01T04:23:34+5:30
महाराष्ट्रदिनी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाची सुरुवात जयसिंगपूर : १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दुपारी दोन ते ...

महाराष्ट्रदिनी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण
महाराष्ट्रदिनी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाची सुरुवात
जयसिंगपूर : १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दुपारी दोन ते पाच या वेळेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यास औपचारिक सुरुवात होत आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
ज्या नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि ज्यांना मेसेज आला आहे, अशा निवडक नागरिकांना औपचारिक सुरुवात म्हणून आज, शनिवारी लस देण्यात येणार आहे. त्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार इतरांना लस दिली जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, गांधीनगर व शिरोळसह जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उपलब्धतेनुसार सर्वांना लस दिली जाईल. लसीकरणाची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी न करता आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.