Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे चार हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 11:54 AM2021-07-09T11:54:34+5:302021-07-09T11:55:42+5:30

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवारी ४,३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड लस आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले. आज, शुक्रवारी ज्यांना फोन येतील त्यांनीच केवळ लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Vaccination of four thousand citizens by the Municipal Corporation | Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे चार हजार नागरिकांचे लसीकरण

Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे चार हजार नागरिकांचे लसीकरण

Next
ठळक मुद्देमहापालिकेतर्फे चार हजार नागरिकांचे लसीकरण८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांचे शुक्रवारी लसीकरण

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवारी ४,३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड लस आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले. आज, शुक्रवारी ज्यांना फोन येतील त्यांनीच केवळ लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

शहरात गुरुवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ४५ वर्षांवरील १०० नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस व ४,२५० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ३०३, राजारामपुरी येथे २७५, पंचगंगा येथे ५५२, महाडीक माळ येथे १८३, सदरबाजार येथे ६६७, फिरंगाई येथे ५५०, सिद्धार्थनगर येथे २४०, कसबा बावडा येथे ७१०, फुलेवाडी येथे ३४६, आयसोलेशन येथे ७४, मोरे मानेनगर येथे ४५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

महानगरपालिका मार्फत शहरात आतापर्यंत १ लाख २८ हजार ७४५ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ५६ हजार १६५ नागरिकांना डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांचे शुक्रवारी लसीकरण -

कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील आणि ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांनी  शुक्रवारी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, महाडीक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सिद्धार्थनगर, मोरेमाने नगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे लसीकरण होणार आहे. ज्या नागरिकांना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडून फोनद्वारे बोलविण्यात येईल अशा नागरिकांनी लसीकरण उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of four thousand citizens by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.