साजणी आरोग्य केंद्रांतर्गत ८३३८ जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:44+5:302021-05-07T04:24:44+5:30

रुकडी माणगाव : साजणी (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माणगाव, माणगाववाडी, तिळवणी, साजणी, कबनूर या गावात ८३३८ नागरिकांना ...

Vaccination of 8338 persons under Sajani Health Center | साजणी आरोग्य केंद्रांतर्गत ८३३८ जणांना लसीकरण

साजणी आरोग्य केंद्रांतर्गत ८३३८ जणांना लसीकरण

रुकडी माणगाव : साजणी (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माणगाव, माणगाववाडी, तिळवणी, साजणी, कबनूर या गावात ८३३८ नागरिकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्यात आली. नागरिक या लसीकरणास चांगले सहकार्य व साथ देत असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. हर्षदअली बोरगावे, डाॅ. निखिल पडियार यांनी दिली. केंद्रांतर्गत लसीकरणचे प्रमाण ४२.७२ टक्के झाले आहे.

प्राथमिक केंद्रांतर्गत माणगाव गावाची लोकसंख्या ८७८० इतकी असून ३४०८ उद्दिष्टापैकी २७०५ ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले आहे. याचे प्रमाण ७९.३७ टक्के आहे. माणगाववाडीची लोकसंख्या १००५ इतकी असून ६०० उद्दिष्टापैकी २२९ ग्रामस्थांचे लसीकरण केले असून याचे प्रमाण ३८.१६ टक्के आहे. तिळवणी गावची लोकसंख्या ३६८० इतकी असून १६४७ उद्दिष्टापैकी ६९९ ग्रामस्थांना लस देण्यात आली आहे. याचे प्रमाण ४२.४४ टक्के आहे. साजणी गावाची लोकसंख्या ५६०७ इतकी असून २१६२ उद्दिष्टापैकी १५६८ ग्रामस्थांचे लसीकरण केले आहे. याचे प्रमाण ७२.५२ टक्के आहे. कबनूर गावाची लोकसंख्या ३३७४७ इतकी असून ११७०० उद्दिष्टापैकी ३१३७ ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले आहे. याचे प्रमाण २६.८१ टक्के आहे. आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. तथापि केंद्रांतर्गत कमी झालेल्या गावातील नागरिकांनी लस उपलब्ध होताच लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of 8338 persons under Sajani Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.