दिवसभरामध्ये ३६ हजारांहून अधिक नागरिकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 13:03 IST2021-04-13T04:24:27+5:302021-04-13T13:03:26+5:30
Corona vaccine kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोमवारी ३६ हजार ४८७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. सकाळी आणखी ५० हजार डोस उपलब्ध झाल्यामुळे बुधवारपर्यंत लसीकरण मोहीम विनाअडथळा सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

दिवसभरामध्ये ३६ हजारांहून अधिक नागरिकांना लस
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये सोमवारी ३६ हजार ४८७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. सकाळी आणखी ५० हजार डोस उपलब्ध झाल्यामुळे बुधवारपर्यंत लसीकरण मोहीम विनाअडथळा सुरू राहण्याची चिन्हे आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी लस संपल्याने त्याचा परिणाम तीन दिवस जाणवला. याआधी १ लाख आणि सोमवारी ५० हजार असे दीड लाख डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यातून हे लसीकरण सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २२६ केंद्रांवर ३७६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला. फ्रंटलाइन वर्कर्सनी दिवसभरामध्ये १२६५ जणांनी दोन्ही डोस घेतले. ४५ वर्षांवरील २०१०८ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ६१२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर ६० वर्षांवरील ११ हजार ६३८ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला तर १४८८ जणांनी दुसरा डोस घेतला.
सोमवारी शिरोळ आणि शाहूवाडी तालुक्यातील काही केंद्रांवर कमी लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले. आवश्यक डोस आल्याने लसीकरण मोहीम सुरू झाली असून अजूनही मोठ्या प्रमाणावर लसीची गरज आहे.