शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: किरणोत्सव पूर्ण क्षमतेने, देवीच्या मळवटापर्यंत किरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:57 IST

पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांतून समाधान

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिराच्या उत्तरायण किरणोत्सव सोहळ्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला. मावळतीच्या सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचून देवीच्या मळवटावर पोहोचला. आज, तिसऱ्या दिवशी किरणे किरिटांच्यावर पोहाेचण्याची अपेक्षा आहे.या किरणोत्सव सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वाराच्या कमानीतून आत आली. त्यानंतर सदर, गणपती मंदिर, कासव चौक, पितळी आणि चांदीचा उंबरठा ओलांडून ६ वाजून १२ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. तेथून पुढे ६ वाजून १६ मिनिटांपासून चेहऱ्यावरून किरिटापर्यंत पोहोचून ती ६ वाजून १७ व्या मिनिटाला लुप्त झाली. पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त झाले.स्वच्छ वातावरण आणि किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर केल्याने हा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. विवेकानंद महाविद्यालयाचे निवृत्त खगोल अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर यांनी या किरणांची तीव्रता अपेक्षेप्रमाणे १६७०० इतकी राहिल्याचे स्पष्ट केले.

किरणांची तीव्रता चारपटींनी अधिक

  • हवेत धूलिकण तसेच ढग नव्हते. स्वच्छ वातावरण होते.
  • मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चारपटींनी अधिक होती.
  • आर्द्रतादेखील अपेक्षेप्रमाणे ४५ टक्के होती.
  • या सर्व स्थितीमुळे पाच दिवसांचा पूर्ण किरणोत्सव झाला.
  • सूर्यकिरणे देवीच्या मळवटापर्यंत पोहोचली.
  • नोव्हेंबरमधील किरणोत्सवात काही अंशी ढगाळ वातावरणाचा अडथळा होता.
  • उत्तरायण कालखंडात सलग दोन दिवस वातावरण स्वच्छ राहिल्याने किरणोत्सव चांगला झाला.

किरणांचा प्रवासजागा - वेळ                

  • महाद्वार कमान : ५: २०                        
  • सदर : ५ : २९                                    
  • गणपती मंदिर मागील बाजू : ५ : ४०
  • कासव चौक : ५:५९                                                
  • पितळी उंबरठा : ६:०२                        
  • चांदीचा उंबरठा : ६ :०५                        
  • गर्भगृह तिसरी पायरी : ६:०७
  • कटांजन : ६:१०                        
  • चरण स्पर्श : ६:१२
  • गुढघ्यापर्यंत : ६:१३
  • कमरेवर : ६:१४
  • चेहरा ते मळवट : ६ वाजून १६ ते १७ मिनिटे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर