शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
3
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
4
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
5
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
6
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
7
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
8
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
9
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
10
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
11
छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी
12
छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार
13
मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली हातात २.३० कोटींची नकली नाणी
14
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
15
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
17
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
18
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
19
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
20
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी

कोल्हापूर रेल्वे स्थानकातील नवा प्लॅटफॉर्म सुरू, नव्या रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:04 IST

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरील नव्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारचा वापर गुरुवारपासून सुरू करण्यात आला. त्यावरून दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सुटली. या प्लॅटफॉर्ममुळे स्थानकातून नव्या रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्लॅटफॉर्मच्या कामाचा प्रारंभ सन २०१९ मध्ये झाला. मात्र, कोरोनामुळे थांबलेले काम गेल्या वर्षभरापासून पुन्हा सुरू झाले. त्यातील अंतिम टप्पा पूर्ण करण्यासाठी मध्यरेल्वेने दि. २१ डिसेंबरपासून आठ दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला. ब्लॉक बुधवारी रात्री संपला. त्यानंतर गुरुवारी रेल्वेच्या पुणे येथील अभियांत्रिकी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी मालवाहतूक रेल्वेच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मची चाचणी घेतली.

ती यशस्वी झाल्याने कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस तेथून सोडण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर आता २४ डब्यांची रेल्वे थांबणार आहे. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे स्थानकाची क्षमता वाढणार आहे.

रेल्वे सेवा पूर्ववत सुरूमेगा ब्लॉक संपल्याने कोल्हापूरची रेल्वेसेवा गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली. तिरुपती, नागपूर एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-सातारा, मिरज, पुणे या पॅसेंजर रेल्वे कोल्हापुरात सुटल्या. मात्र, कोयना एक्स्प्रेस मिरज येथून सुटली.

आता स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची संख्या चार झाली आहे. त्यामुळे सध्या होणारी यार्डमधील अडचण कमी होईल. रेल्वेचे इंजिन वळविण्यातील वेळ वाचणार आहे. नव्या लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करता येणार आहेत. -विजयकुमार, प्रबंधक, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस 

नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोनच्या विस्तारीकरणाची प्रतीक्षा संपली. आता कोल्हापूरच्या रेल्वे सेवेला गती मिळेल. अमृतसर, जम्मूतावी, जयपूर या मंजूर रेल्वे कोल्हापुरातून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रेल्वे लवकर सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा. -शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे, विभागीय रेल्वे सल्लागार समिती 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे