गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर एकरी वाहतूक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:50 IST2020-12-11T04:50:16+5:302020-12-11T04:50:16+5:30
कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील ड्रेनेजचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा अगर दिवसा ...

गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर एकरी वाहतूक करा
कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील ड्रेनेजचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा अगर दिवसा एकेरी करावा, अशी मागणी आखरी रस्ता कृती समितीतर्फे केली. मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्याकडे देऊन चर्चा केली.
गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे अनेक वर्षे प्रलंबित काम जनआंदोलनाने सुरू झाले. सध्या शुक्रवार गेट ते शिवाजी पूल या रस्त्याचे काम सुरू आहे. येथील ड्रेनेजचे काम सध्या सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून या मार्गावरील अवजड वाहतूक व ऊस वाहतूक बंद केली, त्याचे नागरिकांतून स्वागत होत आहे; पण रात्रीच्या वेळेला अगर शहर वाहतूक पोलीस नसताना किंवा सकाळी सहानंतर येथून ऊस वाहतूक सुरू असते. अशी अवजड वाहने रस्त्यावरून जात असल्याने रस्त्यावरील पाईपलाईन फुटू लागल्या आहेत. त्यातच ड्रेनेज लाईन दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे गंगावेश ते शिवाजी पूल हा मार्ग वाहतुकीसाठी दिवसा एकेरी करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळात किशोर घाटगे, राकेश पाटील, महेश कामत, रियाज बागवान, आदींचा समावेश होता.
फोटो नं. १०१२२०२०-कोल-आखरी रास्ता रोड
ओळ : कोल्हापुरातील गंगावेश ते शिवाजी पूल हा मार्ग दिवसा एकेरी वाहतुकीचा करावा, अशा मागणीचे निवेदन आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांना गुरुवारी दुपारी दिले.
(तानाजी)