अमेरिकेतील विद्यार्थ्यांची मुस्लिम बोर्डिंगला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:24 IST2019-12-11T14:22:19+5:302019-12-11T14:24:12+5:30

अमेरिकेच्या डेन्व्हर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी  दसरा चौकातील दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग), नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला अभ्यासभेट दिली. संस्थेचे चेअरमन गणी अजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास यांनी त्यांचे स्वागत केले. अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

US students visit Muslim boarding | अमेरिकेतील विद्यार्थ्यांची मुस्लिम बोर्डिंगला भेट

 अमेरिकेतील डेन्व्हर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी  कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग आणि नेहरू हायस्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ठळक मुद्देअमेरिकेतील विद्यार्थ्यांची मुस्लिम बोर्डिंगला भेटनेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर : अमेरिकेच्या डेन्व्हर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी  दसरा चौकातील दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग), नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला अभ्यासभेट दिली. संस्थेचे चेअरमन गणी अजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास यांनी त्यांचे स्वागत केले. अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या अभ्यासभेटीत डेन्व्हर विद्यापीठातील शिक्षक स्कॉट कॉफोरा, केव्हिन मॅडी, होलीस, रुबेका, व्हिक्टोरिया, कॅटरीन या विद्यार्थ्यांचा समावेश होता. डॉ. असिफ सौदागर यांनी मुस्लिम बोर्डिंगविषयी माहिती दिली. सानोबर चौधरी यांनी संस्था, शाळेची माहिती दिली.

शालेय समितीचे चेअरमन फारुक पटवेगार यांनी आभार मानले. जिलानी शेख यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी दुभाषी म्हणून एम. बी. बिच्चू यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक एस. एस. काझी, संचालक पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, हमजेखान शिंदी, रफिक शेख, मलिक बागवान, जहॉँगीर अत्तार, अल्ताफ झाजी उपस्थित होते.

 

 

Web Title: US students visit Muslim boarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.