कोल्हापूर : आखाती देशांमधील युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढत असल्याने या युद्धाचा थेट इंधनपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती भारतातील सर्वच शहरांना आहे. रोज तब्बल १२ लाख लिटर इंधन विक्री होणाऱ्या कोल्हापुरातही या भीतीचे ढग जमत असल्याने कोल्हापुरातील पेट्रेल-डिझेल पंपचालकांनी सावधगिरीचा उपाय म्हणून आतापासूनच पेट्रोल-डिझेलचा साठा करायला सुरुवात केली आहे. त्या दृष्टिकोनातून मिरजेतील डेपोतून अधिकचे इंधन मागविले जात आहे.कोल्हापुरात ३०० च्या आसपास पेट्रोलपंप आहेत. रोज साडेसहा लाख लिटर पेट्रोल, तर साडेपाच लाख लिटर डिझेलची विक्री होते. मिरज व भिलवडीजवळील हजारेवाडी येथे दोन मोठे डेपो आहेत. याच डेपोतून जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपचालकांना इंधन पुरवठा केला जातो. या दोन डेपोंमध्ये गुजरातच्या जामनगर येथील रिफायनरीमधून इंधन येते. अर्ध्या जगाची इंधनाची तहान भागविणाऱ्या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्याने इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पंपचालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पेट्रेाल-डिझेलची अधिकची मागणी वाढविली आहे.साठवणुकीसाठी टाक्यांची क्षमता मोठीजिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल पंपांमध्ये २० हजारांपासून ४० हजार लिटरपर्यंतच्या इंधन साठवणुकीच्या टाक्या आहेत. काही मोठ्या पंपांमध्ये ही क्षमता ७० हजार लिटरपर्यंत आहे. शिवाय, स्वत:चे टँकर असल्याने त्यातही एक-दोन दिवस इंधन साठवू शकतात. युद्धाच्या ज्वाळा रोज वाढत असल्याने काही पंपचालकांनी मिरज व हजारेवाडीच्या डेपोतून अधिक इंधनाची मागणी केली आहे.प्रत्येकालाच इंधनटंचाईची भीतीआखाती देशांमध्ये याआधीही अनेकवेळा युद्धाचा वणवा पेटला आहे. मात्र, त्याचा थेट परिणाम कधीही येथील इंधनपुरवठ्यावर झाला नाही. मात्र, युद्धाच्या ज्वाळा यावेळी जास्त भडकल्याने इंधनटंचाईची थोडीफार भीती उभ्या देशाला आहे. त्यातूनच इंधनसाठा करण्यासाठी धडपड सुरू आहे.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यात इंधनपुरवठा
- रोज पेट्रोल विक्री : ६.५ लाख लिटर
- रोज डिझेल विक्री : ५.५ लाख लिटर
- जिल्ह्यातील पंप : ३००
- होणारा इंधरपुरवठा : मिरज, हजारेवाडी येथील डेपो
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अजून तरी इंधनपुरवठ्यावर झालेला नाही. दहा-पंधरा दिवस पुरेल इतके इंधन जिल्ह्यात उपलब्ध आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून काहींनी इंधनाची अधिकची मागणी नोंदवली आहे. - अरविंद तराळ, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन.
Web Summary : Amidst US-Iran war fears, Kolhapur petrol pump operators are increasing fuel stocks. Anticipating supply disruptions, they're sourcing extra petrol and diesel from Miraj depot to meet the daily demand of 1.2 million liters.
Web Summary : अमेरिका-ईरान युद्ध के खतरे के बीच, कोल्हापुर के पेट्रोल पंप संचालक ईंधन का भंडारण बढ़ा रहे हैं। आपूर्ति में व्यवधान की आशंका से, वे 12 लाख लीटर की दैनिक मांग को पूरा करने के लिए मिरज डिपो से अतिरिक्त पेट्रोल और डीजल ले रहे हैं।