शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यांचा गैरवापर; तपासासाठी युपी पोलिस कोल्हापुरात, फसवणूक झालेल्या तरुणाचा जबाब नोंदवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:22 IST

कोल्हापूर : तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांद्वारे काढलेल्या बँक खात्यांचा ऑनलाइन फसवणुकीसाठी वापर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चार महिन्यांपूर्वी ...

कोल्हापूर : तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांद्वारे काढलेल्या बँक खात्यांचा ऑनलाइन फसवणुकीसाठी वापर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चार महिन्यांपूर्वी उघडकीस आणला होता. याबाबत उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात फिर्याद दाखल झाली आहे. तपासासाठी कानपूर पोलिस बुधवारी (दि. ३०) कोल्हापुरात पोहोचले. फसवणूक झालेल्या तरुणाचा जबाब नोंदवला असून, बँक खाते काढण्यासाठी त्याला पैशांचे आमिष दाखवणाऱ्या संशयितांचा शोध सुरू असल्याचे कानपूर पोलिसांनी सांगितले.जिल्ह्यातील काही बेरोजगार तरुणांना ५ ते २५ हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांद्वारे विविध बँकांमध्ये खाती काढली होती. संबंधित खात्यांना सायबर चोरट्यांनी त्यांचे स्वत:चे मोबाइल नंबर जोडल्याने मूळ खातेदारांना त्यावरील व्यवहारांची काहीच कल्पना आली नाही. सायबर चोरट्यांनी या खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी केला आहे. जुलै २०२३ ते जून २०२४ या काळात कोल्हापूरसह सीमाभागातील अनेक तरुणांच्या खात्यांवरून लाखो रुपयांचे व्यवहार झाले.या सर्व रकमा सायबर चोरट्यांनी काढून घेतल्या आहेत. याबाबत उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या पोलिसांनी काही बँक खातेदारांना नोटिसा पाठवल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला. पाच-दहा हजारांच्या आमिषाने तुरुंगात जाण्याची वेळ आल्याने संबंधित खातेदारांचे धाबे दणाणले होते.गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन कानपूर येथील सिसामाऊ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राणू रमेश चंद्र आणि संकल्प पांडे यांचे पथक बुधवारी कोल्हापुरात दाखल झाले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचून त्यांनी संशयित खातेदारांचा शोध सुरू केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका तरुणाला शोधून त्याचा जबाब नोंदवला.

एजंट पळालेबेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावे बँक खाती काढणारे एजंट कारवाईच्या भीतीने पळाले आहेत. कदमवाडीतील एका एजंटने शहरातील ३५ ते ४० जणांच्या नावे खाती काढली आहेत. कागल आणि निपाणी येथील दोघांचाही या रॅकेटमध्ये समावेश असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.

देशभर व्याप्तीकानपूरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन लाखांची रक्कम कोल्हापुरातील तरुणाच्या खात्यावर वर्ग झाली आहे. त्याच गुन्ह्यातील पैसे महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील विविध शहरांमधील बँक खात्यांमध्ये जमा झाल्याची माहिती कानपूर पोलिसांनी दिली. याची व्याप्ती मोठी असल्याने देशभर तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसfraudधोकेबाजीbankबँक