विद्यापीठाची ग्रंथसूची आता आॅनलाईन
By Admin | Updated: December 5, 2014 00:26 IST2014-12-04T23:57:32+5:302014-12-05T00:26:28+5:30
वेब ओपॅक : मराठी ग्रंथांचे शीर्षक शोधण्यासाठी ट्रान्स्लेशन टूल

विद्यापीठाची ग्रंथसूची आता आॅनलाईन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या वाचनसाहित्याची तालिका ‘आॅनलाईन पब्लिक अॅक्सेस कॅटलॉग’ (ओपॅक) आता वेब ओपॅक स्वरूपात उपलब्ध झाली आहे. यापूर्र्वी या तालिकेचा वापर इंट्रानेटद्वारे केवळ विद्यापीठ परिसरातील विभागांपुरताच मर्यादित होता, पण आता जगातील कोणत्याही भागातून ओपॅक यंत्रणेद्वारे विद्यापीठाच्या ग्रंथालयातील ग्रंथसूची वाचकांना पाहता येणार आहे, अशी माहिती ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी दिली.
वेब ओपॅक विद्यापीठाच्या ६६६.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल या संकेतस्थळावरून ग्रंथालय पोर्टलच्या लिंकद्वारे ‘ओपॅक’ मेनूअंतर्गत ँ३३स्र://ङ्मस्रंू.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल:8080/ङ्मस्रंू या संकेतस्थळावर खुली आहे. मराठी ग्रंथांचे शीर्षक शोधण्यासाठी गुगल ट्रान्स्लेशन टूल वापरून युनिकोड मराठी स्क्रिप्ट टाइप करण्याची सोय असल्याचे डॉ. खोत यांनी सांगितले.
ब्राऊज, आय. एस. बी. एन. क्रमांक वा दाखल क्रमांक (अॅक्सेशन नंबर) यांद्वारे साहित्याचा शोध घेणे सोयीचे होणार आहे. तसेच लेखक, शीर्षक, सीरिज, विषय, प्रकाशन स्थळ, तसेच प्रकाशक अशा विविध अंगांनी ग्रंथालयातील उपलब्ध वाचनसाहित्याचा शोध घेऊन त्याचा वापर करणे शक्य होणार आहे. ग्रंथालय सदस्य आपली माहिती ‘मेंबर आयडी कोड’द्वारे पाहू शकतात.
या केंद्रात संशोधकांना उपयुक्त असे पोर्टल तयार केले आहे. त्याद्वारे मोफत आॅनलाईन संशोधनस्रोत उपलब्ध करून दिले आहेत. संशोधनासाठी उपयुक्त विषयांच्या महत्त्वाच्या वेबसाईटच्या लिंकही उपलब्ध केल्या आहेत. याकामी सहायक ग्रंथपाल पी. बी. बिलावर, सहायक ग्रंथपाल डी. बी. सुतार, वरिष्ठ ग्रंथालय सहायक सुनील बिर्जे, ए. ए. देवकर, आदींनी महत्त्वपूर्ण काम केल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
वेब ओपॅकचा उपयोग...
ग्रंथालयात सुमारे तीन लाख ग्रंथ, सहा हजारांहून अधिक शोधप्रबंध, शोधपत्रिका यांची ग्रंथसूची वेब ओपॅकवर उपलब्ध आहे. उपलब्ध ग्रंथांचे बिब्लिओग्राफिक डिटेल्स पाहता येणार आहेत. शिवाय पुस्तक उपलब्ध आहे का, पुस्तकाच्या एकूण प्रती, त्यांपैकी उपलब्ध प्रती अशी सर्व प्रकारची माहिती पाहता येणार आहे.
५‘इ-रिसोर्सेस’ उपलब्ध करणार
वेब ओपॅक यंत्रणा आॅनलाईन उपलब्ध झाल्यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वाचकांना बॅ. खर्डेकर ग्रंथालयातील वाचनसाहित्याची सद्य:स्थिती पाहता येणार आहे. यापुढील काळात ग्रंथालयातील सर्व इलेक्ट्रॉनिक वाचनसाहित्य (इ-रिसोर्सेस) विद्यापीठ कॅम्पसबाहेरील नोंदणीकृत वाचकांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे डॉ. खोत यांनी सांगितले.