शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

कोल्हापुरात अमित शाह यांची साखरपेरणी, साखर कारखानदारांसह बँकांच्या प्रमुखांना लावले कामाला 

By राजाराम लोंढे | Published: May 06, 2024 1:34 PM

महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र 

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक रात्र कोल्हापुरात घालवून चांगलीच साखर पेरणी केली आहे. ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघातील साखर कारखानदार, सहकारी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांनी योग्य तो संदेश दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस ठोकलेला तळ, पडद्यामागून लावलेल्या जोडण्या पाहता, गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीची डोकेदुखी काहीशी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.‘कोल्हापूर’ मतदारसंघात काॅंग्रेसचे शाहू छत्रपती व शिंदेसेनेचे संजय मंडलिक यांच्यात निकराची झुंज आहे. शाहू छत्रपती यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने ते वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचा शेवटपर्यंत घोळ सुरू राहिल्याने त्यांच्या समर्थकांमध्येच चलबिचल असल्याने प्रचाराला उशिरा सुरुवात झाली. मात्र, महायुतीची फौज घेऊन त्यांनी प्रचाराला गती घेतली आहे. कोल्हापुरात सरळ लढत होत असल्याने विजयाचा लंबक सतत फिरत आहे. ‘हातकणंगले’मध्ये उद्धवसेनेने ऐनवेळी सत्यजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर करून ते हवा तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. उमेदवारी मिळते की नाही? या गोंधळात शिंदेसेनेची उमेदवारीची माळ गळ्यात पाडण्यात धैर्यशील माने यशस्वी झाले. आघाडीला आपल्याशिवाय पर्याय नाही, हे गृहीत धरून कामाला लागलेले राजू शेट्टी यांना एकला चलोची भूमिका घ्यावी लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवर येथे अस्तित्वाची तिरंगी लढत होत आहे. दोन्ही मतदारसंघांतील अंदाज महायुतीच्या नेत्यांना आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे तळ ठोकला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे एक दिवस येऊन गेले. त्यांना ज्यासाठी आणले होते, तो उद्देश सफल झाल्याची चर्चा आहे.दोन्हीकडे ११ सहकारी, तर १२ खासगी कारखानदार आहेत. त्या सगळ्यांसह प्रमुख बँकांचे पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला असून, त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहच केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही जोडण्या लावल्या असून, त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जोरदार घडामोडी घडत आहेत.जोडण्यांसाठी ठाणे, पुण्यातील टीममहायुतीच्या उमेदवारांसाठी जोडण्या लावण्यांसाठी ठाणे, पुण्यातील टीम कोल्हापुरात तळ ठोकून आहे. आघाडीतील काही मासे गळाला लागतात का? यावर ते नजर ठेवून आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Amit Shahअमित शाह