शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

भाविकांच्या अनुपस्थितीतही अंबाबाईच्या चरणी अखंड सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 2:09 PM

Navratri, Mahalaxmi Temple Kolhapur सालंकृत पूजेने सजलेली अंबाबाई, विद्युत रोषणाईने झगमगलेल्या मंदिरात एकटीच उभी आहे, जणू भक्तांच्या प्रतीक्षेत. यंदा भक्तांसाठी तिचे दरवाजे बंद असले तरी नवरात्रौत्सवात भक्तांकडून केली जाणारी सेवा आता श्रीपूजकांसह देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांकडूनच केली जात आहे.

ठळक मुद्देभाविकांच्या अनुपस्थितीतही अंबाबाईच्या चरणी अखंड सेवा श्रीपूजकांसह देवस्थान कर्मचाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग

इंदुमती गणेशकोल्हापूर : सालंकृत पूजेने सजलेली अंबाबाई, विद्युत रोषणाईने झगमगलेल्या मंदिरात एकटीच उभी आहे, जणू भक्तांच्या प्रतीक्षेत. यंदा भक्तांसाठी तिचे दरवाजे बंद असले तरी नवरात्रौत्सवात भक्तांकडून केली जाणारी सेवा आता श्रीपूजकांसह देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांकडूनच केली जात आहे. देवीसमोर गायन-वादन असो वा पालखी सोहळ्यातील लवाजमा; नायकिणीचं गाणं असो किंवा देवीसोबतच चालणारे रोषणनाईक; या सगळ्या सेवेकऱ्यांकडून देवीचा उत्सव पार पाडला जात आहे.नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर भाविकांनी गजबजलेले असते. सिद्धिविनायक मंदिरासमोर सकाळी सहा वाजल्यापासून देवीस्तुतीसह दिवसभर भक्तिगीते, भजन, कीर्तन, भरतनाट्यम, कथ्थक, गोंधळ यांसह लोककला सादर होतात. रात्री साडेदहापर्यंत देवीचा जागर सुरू असतो. यंदा मात्र भाविक नसल्याने मंदिरात अस्वस्थ करणारी शांतता आहे. या शांततेला छेद देत उत्सवाचा रंग भरण्याचा प्रयत्न मंदिरातील पुजाऱ्यांसह देवस्थानचे कर्मचारी करीत आहेत.एरवी नवरात्रात क्षणाचीही उसंत नसते. यंदा सगळेच निवांत असल्याने दुपारची आरती झाली की पुजाऱ्यांसह मंदिरात वाजंत्र्यांची जबाबदारी असलेले नगारखान्यातील कर्मचारी कासव चौकात येऊन बसतात. प्रत्येकाला वेळ मिळेल त्याप्रमाणे ते आपली सेवा देतात. कोणी तबला वाजवतो, कोणी वाजंत्री, कोणी पेटी, कुणाकडे टाळ तर कुणाचा गोड आवाज आहे.

सगळे मिळून देवीसमोर भजन, विविध देवदेवतांची पदे सादर करतात. सनई वाजवणारा अमित साळोखे, खजिनदार महेश खांडेकर, सीसीटीव्हीसह डिजिटल यंत्रणा सांभाळणारे राहुल जगताप, अभिजित पाटील यांच्यासह सफाई कर्मचारीही यात तल्लीन होतात.अंबाबाईच्या पालखीसमोर भक्तिगीते गाइली जातात. याच प्रदक्षिणेत गाणे सादर करण्याचा मान नायकिणीला असतो. आजही वयस्कर नायकीण देवीसमोर गाणे सादर करते. दिवसभरात पाच वेळा घाटी दरवाजावरील घंटा वाजवणे आणि पालखीला देवीसमोर दंड घेऊन उभारणारा चोपदार, रोषणनाईक, तोफेची सलामी देणारे व मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव असे सगळे कर्मचारी मिळून हा नवरात्रौत्सव पार पाडत आहेत. 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर