शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: 'राखी' रुसलीः रक्षाबंधन दिवशीच चिमुकल्या भावाचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:03 IST

घरी रक्षाबंधनासाठी वाट पहात बसलेल्या बहिनींना भावाच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ आली

व्ही. जे.साबळेतुरंबे : रक्षाबंधना दिवशीच चिमुकल्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन वर्षीय आरोहन संदिप घारे असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे घडली. या घटनेने घारे कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला. आरोहन मृत्यूने चोरपावलांनी अचानक गाठलं आणि छोट्या बहिनींचे त्याच्या हाती राखी बांधण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. घारे कुटूंबात 'आरोही' व 'ओवी' या दोन कन्येंच्या पाठीवर दोन वर्षापूर्वी 'आरोहन' या चिमुकल्याचा जन्म झाला. अचानकच 'आरोहन'ला शारीरिक त्रास सुरु झाला. वैद्य-हाकीम झाले, शेवटी एका बालरोगतज्ञाला निदान लागले आणि समजले की मुलांला 'ब्रेन ट्युमर' झाला आहे. या कष्टकरी कुटूंबानं बाळाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

गेल्या २२ एप्रिल रोजी त्याची ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया केली. पण त्यामध्ये दुर्दैवाने त्याची दृष्टी गेली. गेली चार महिने तो फक्त आवाजावरून माणसं ओळखत होता. पण मंगळवारी अचानक त्याला जास्त अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला भोगावती येथील बालरोग तज्ञाकडे दाखल केले. 

बहिणींचा भावाला बघण्यासाठी आग्रहयावेळी घरी असलेल्या दोन लहान बहिणींनी भावाला दवाखान्यात बघण्यासाठी नेण्याचा वडीलांकडे आग्रह धरला. तेंव्हा वडीलांना मुलींना समजावत सांगितले, उद्या रक्षाबंधन आहे, मी भैयाला सकाळी घरी घेवून येतो. तुम्ही त्याला राखी बांधून त्याचे औक्षण करा. मुलींनी वडिलांचे म्हणणे ऐकून दवाखान्यात जाण्याचा हट्ट सोडला. 

अचानक आरोहनची तब्बेत बिघडली अन् प्राणज्योत मालवलीमात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेचे होते. रात्री चिमुकल्या आरोहनची तब्बेत अचानक बिघडली आणि पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. घरी रक्षाबंधनासाठी वाट पहात बसलेल्या बहिनींना भावाच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ आली. यावेळी आई-वडील व कुटुंबियांनी फोडलेला टाहो सर्वांची ह्दय पिळवटून टाकणारा होता.आज तिटवे गावावर या घटनेने शोककळा पसरली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaksha Bandhanरक्षाबंधनDeathमृत्यू