शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोगे येथील राष्ट्रीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 15:10 IST

कोगे (ता. करवीर) येथील मोरे मळा परिसरातील झाडावर चढून पुरात वाहून आलेले वाळलेले झाड बाहेर काढत असताना ते अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रीय कुस्तीपटूचा सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. विक्रम भगवान मोरे (वय २५) असे त्याचे नाव आहे.  विक्रम आपल्या अन्य तिघा मित्रांसमवेत गेला असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकोगे येथील राष्ट्रीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यूपुरात वाहून आलेले झाड काढताना अंगावर कोसळले

सावरवाडी : कोगे (ता. करवीर) येथील मोरे मळा परिसरातील झाडावर चढून पुरात वाहून आलेले वाळलेले झाड बाहेर काढत असताना ते अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रीय कुस्तीपटूचा सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. विक्रम भगवान मोरे (वय २५) असे त्याचे नाव आहे.  विक्रम आपल्या अन्य तिघा मित्रांसमवेत गेला असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भोगावती नदीला आलेल्या महापुरात मोरे मळा परिसरात वाहून आलेले वाळलेले झाड शेजारच्या एका झाडावर अडकले होते. ते घरी घेऊन जाण्यासाठी विक्रम आपल्या तिघा मित्रांसमवेत मोरे मळा परिसरात रविवारी दुपारी आला होता. वाळलेले झाड १५ फूट उंच शेजारील झाडावर अडकले होते. ते काढण्यासाठी विक्रम झाडावर चढला. वाळलेल्या झाडाला दोन्ही हातांनी धक्का देत असताना झाड उभे होऊन थेट त्याच्या अंगावर कोसळले.

चेहरा आणि छातीला जोराचा मार लागून तो चढलेल्या झाडाच्या खोचात अडकून पडला. खाली उभ्या असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीसाठी आले. त्यांनी वर झाडावर अडकून पडलेल्या विक्रमला बेशुद्धावस्थेत खाली उतरविले. तेथून त्याला तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विक्रमच्या मृत्यूचे वृत्त समजताच ग्रामस्थ, नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली. नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. करवीर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.देशात गावाचे नाव उज्वलकोगे गावातील कुस्ती क्षेत्रातील विक्रम हा नामवंत मल्ल होता. त्याने आॅल इंडिया कुस्ती चॅम्पियनशिप प्राप्त केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय पदके पटकावून कोगे गावाचे नाव देशात उज्ज्वल केले होते. राष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून त्याचा नावलौकीक होता. काळम्मादेवी केसरी गदा (आमशी) व कुमार कामगार केसरी गदा (पुणे) यांचा तो मानकरी ठरला होता. कुडित्रे नंतर सध्या तो पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलमध्ये सराव करीत होता.खिलाडू वृत्तीविक्रम हा लहानपणापासूनच खिलाडू वृत्तीचा होता. धाडसी असल्याने तो प्रत्येक कामात पुढे असायचा. त्याचे वडील शेती करतात. अतिशय कष्टातून त्यांनी विक्रमला पैलवान बनविले होते. त्यांचे स्वप्नही विक्रमने पूर्ण केले होते. त्याने आपल्या कुस्तीच्या डावपेचांतून अनेक मल्ल घडविले आहेत. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे तालुक्यातील पैलवान, कुस्तीशौकीन शोकसागरात बुडाले. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरAccidentअपघातkolhapurकोल्हापूर