शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्याकडे अडकला २४५ कोटी रुपये भत्ता गृहरक्षक दलाच्या ५६ हजार : जवानांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:47 IST

कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना गेल्याच महिन्यात अचानक सेवेतून मुक्त केले आहे. त्यांनी बजावलेल्या सेवेचा सुमारे २४५ कोटी रुपये एकूण भत्ताही शासनाकडे प्रलंबित आहे.

ठळक मुद्देअचानक सेवामुक्ती

तानाजी पोवारकोल्हापूर : पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी, त्यांना साहाय्य करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील गृहरक्षक (होमगार्ड) दलाच्या सुमारे ५६ हजार जवानांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना गेल्याच महिन्यात अचानक सेवेतून मुक्त केले आहे. त्यांनी बजावलेल्या सेवेचा सुमारे २४५ कोटी रुपये एकूण भत्ताही शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कोटी रुपयांचा समावेश आहे. त्यामुळे गृहरक्षक जवान हवालदिल झाले आहेत.

वाहतुकीचे नियंत्रण, विविध सणासुदीचे दिवस, यात्रा, निवडणुकीचे बंदोबस्त, आदी प्रसंगी पोलिसांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून अत्यंत किरकोळ भत्त्यावर प्रामाणिकपणे सेवा बजावणा-या राज्यातील सुमारे ५६ हजार गृहरक्षक दलाच्या जवानांना कोणतीही पूर्वकल्पना न देता दि. १० जानेवारीपासून मुक्त करण्यात आले. त्याबाबतचे लेखी आदेश गृहरक्षक दलाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व्ही. टी. धकाते यांनी जिल्हा समादेशकांना पाठविले.

सर्व गृहरक्षक दलाच्या जवानांना गेल्या तीन महिन्यांत भत्ता मिळाला नसल्याने तसेच त्यांना सेवामुक्त केल्याने त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. राज्यातील सर्व गृहरक्षक जवानांच्या एकूण २४५ कोटी रुपये भत्त्याची रक्कम शासनाकडे थकीत आहे. अनेकजण उच्च शिक्षण घेऊनही मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी पैसे देण्याची ऐपत नसल्याने खासगी ठिकाणी मोलमजुरी करून गृहरक्षक दलात अत्यंत तोकड्या भत्त्यावर सेवा बजावत होते; पण आता उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने हे जवान सैरभैर झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गृहरक्षक दलाचे सुमारे २१०० जवान सेवेत कार्यरत होते. त्यांना प्रतिदिवशी ६५० रुपये भत्ता देण्यात येत होता. त्यांना वर्षाला १४० दिवस बंदोबस्ताची सेवा देणे बंधनकारक होते. दर दोन महिन्यांना ७८० जवानांचे गट करून त्यांना दोन महिने सेवेची संधी दिली जात होती; पण आता याच जवानांवर नोकऱ्यांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.कोल्हापूर जिल्ह्याचे पाच कोटी थकीतकोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २१०० गृहरक्षक जवान सेवेत होते. त्यांपैकी १९०० जवानांनी गेल्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने गटवार सेवा बजावली आहे. त्यांपैकी लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त केलेल्या काहींना भत्ता मिळाला; तर अनेकांना अद्याप तो मिळायचा आहे. त्याशिवाय गणेशोत्सव, विधानसभा निवडणुकीत बंदोबस्त बजावलेल्या गृहरक्षक जवानांना अद्याप भत्ता मिळालेला नाही. असा प्रत्येक जवानाचा किमान ४० हजारांपासून ७० हजार रुपयांपर्यंत भत्ता शासनाकडे प्रलंबित आहे. असे कोल्हापूर जिल्ह्याचे सुमारे पाच कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत, ते मार्चअखेर देण्यात येतील, असे तोंडी सांगितले जात आहे. अखेर उदरनिर्वाहाचे साधन समोर नसल्याने गृहरक्षक दलाच्या जवानांचे जीवनमान अंधकारमय बनत आहे.

 

पोलिसांवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने साहाय्य करण्यासाठी गृहरक्षक जवानांना बंदोबस्त दिला जात होता; पण वरिष्ठ पातळीवरून सेवामुक्तीचा आदेश आल्याने अनेक ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी तैनात केलेले जवान काढून घेतले आहेत.- श्रीनिवास घाटगे, जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसfundsनिधी