शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या जिवाशी खेळ! दुर्गंधीयुक्त पाण्याचा होतोय पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 11:48 IST

घराघरात मळीमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यानं महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देमळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठाअनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणामपाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

- ज्योती पाटील पाचगाव(कोल्हापूर) - शहरातील दीपसेवक सोसायटी आर.के.नगर (पाचगाव) या परिसरातील घराघरात मळीमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यानं महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा तक्रारी करुनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. याकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं तात्काळ लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी या परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे. 

आर.के.नगर येथील दीपसेवक सोसायटीमध्ये गेल्या वर्षभरापासून लोकांच्या घरात मळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. तसंच एकदिवस आड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागलेले आहेत.  दुर्गंधीयुक्त पाण्याने अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.   

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पुरावा म्हणून अशुद्ध पाणी बाटलीतून घेऊन अधिकाऱ्यांनाही दाखवले आहे. पण अद्याप नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सांगितले की त्यांच्याकडून उलट उत्तरं मिळतात, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.अपुऱ्या आणि मळीमिश्रित पाणीपुरवठ्याचे बिल मात्र वेळेत येत आहे. येथील लोकांनी बिले वेळेत भरुनसुद्धा  त्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. अनेकांनी घरात पाणी शुद्ध करण्याचे यंत्र बसवली आहेत. पण त्या पाण्यालाही दुर्गंधी येते. त्यामुळे आता यासंदर्भात तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न येथील रहिवाशांनी पडला आहे.  

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर