शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

'भूसंपादन'च्‍या तत्कालीन लिपिकाकडे १९ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, लाचलुचपत विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 17:30 IST

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश सूर्यवंशी व त्यांची पत्नी अर्चना सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आज, गुरुवारी गुन्हा दाखल केला.

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागातील तत्कालीन लिपिकाने बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत उघड झाले. सतीश गणपतराव सूर्यवंशी (रा. प्लॉट नं. ५९, श्री बंगला, दिंडेनगर हौसिंग सोसायटी, पाचगाव, कोल्हापूर) असे या लिपिकाचे नाव आहे.चौकशीमध्ये त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतपेक्षा एकूण १९ लाख ७८ हजार ६६१ रुपये बेहिशेबी मालमत्ता केली असून, त्याचे प्रमाण हे १७.६८ टक्के असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश सूर्यवंशी व त्यांची पत्नी अर्चना सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आज, गुरुवारी गुन्हा दाखल केला.याबाबत माहिती अशी, सतीश सूर्यवंशी हे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात लिपिक या पदावर कार्यरत आहेत. याआधी ते भूसंपादन विभागात कार्यरत होते. लिपिक सूर्यवंशी यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसारमालमत्तेची झडती घेतली असता सूर्यवंशी व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा १९ लाख ७८ हजार ६६१ रुपयांची (१७.६८ टक्के) बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

तसेच सूर्यवंशी यांना त्यांच्या पत्नी अर्चना सूर्यवंशी यांनी सहाय्य केल्याने दोघांवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने पो. नि. कुंभार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घराची व इतर संपादित मालमत्तेची झडती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग