शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

उदं गं आई उदं...! रेणुकादेवीच्या यात्रेसाठी भाविक सौंदत्तीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 3:48 PM

कोल्हापूर शहरासह आसपासच्या गावांतील भाविक रविवारी रात्री उशिरा एस. टी. आणि खासगी बसने येथील रेणुकादेवीच्या मार्गशीर्ष यात्रेसाठी सौंदत्तीला (कर्नाटक) रवाना झाले. ‘उदं गं आई उदं’च्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. यात्रेसाठी जाणाऱ्यांकडून भंडारा लावण्यात येत होता. बुधवारी (दि. ११) यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशीही काही भाविक सकाळी लवकर मार्गस्थ होणार आहेत.

ठळक मुद्देउदं गं आई उदं...! रेणुकादेवीच्या यात्रेसाठी भाविक सौंदत्तीला रवाना बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या गावांतील भाविक रविवारी रात्री उशिरा एस. टी. आणि खासगी बसने येथील रेणुकादेवीच्या मार्गशीर्ष यात्रेसाठी सौंदत्तीला (कर्नाटक) रवाना झाले. ‘उदं गं आई उदं’च्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. यात्रेसाठी जाणाऱ्यांकडून भंडारा लावण्यात येत होता. बुधवारी (दि. ११) यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशीही काही भाविक सकाळी लवकर मार्गस्थ होणार आहेत.सौंदत्ती येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात श्री रेणुकादेवीची यात्रा असते. कोल्हापुरातून लाखांवर भाविक या यात्रेला जातात. ही यात्रा कोल्हापूरकरांचीच म्हटले तर वावगे ठरणार नाही. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसचे बुकिंग अगोदरच करण्यात आले आहे.

रविवारी रात्री उशिरा कोल्हापुरातून मोठ्या संख्येने भाविक सौंदत्तीला रवाना झाले. बुधवारी मुख्य यात्रा असून, रात्री पालखीनंतर भाविक परतीच्या मार्गाला लागणार आहेत. गुरुवारी पहाटे या बसेस पुन्हा कोल्हापुरात दाखल होणार असून, ओढ्यावरील रेणुका मंदिरात दर्शन घेऊन भाविक आपापल्या घरी पोहोचणार आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरातील महालक्ष्मी रेणुका भक्त मंडळाचे सरचिटणीस गजानन विभूते व शोभा विभूते यांच्यातर्फे सर्व भक्तांना ड्रेस कोड देण्यात आला. माजी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते बसचे पूजन करून भाविक सौंदत्तीला रवाना झाले. यावेळी सुशांत विभूते, माधुरी विभूते, प्रशांत विभूते, मनोज पेटकर, मधुकर भोसले, प्रशांत पोवार, केरबा झोरे, संभाजी कुपटे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर