उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !
By Admin | Updated: April 29, 2017 00:40 IST2017-04-29T00:40:44+5:302017-04-29T00:40:44+5:30
उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !
वर्धापनदिनाचा लोकप्रतिनिधींना विसर : मासिक सभेत चर्चा नाही
संतोष बामणे ल्ल उदगांव
सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर शिरोळ तालुक्यातील उदगांव ग्रामपंचायतीच्या स्थापनेला १ मे रोजी तब्बल ९० वर्षे पूर्ण होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ९० व्या वर्धापन दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १ मे १९२७ रोजी सुमारे ३०० कुटुंब असलेल्या उदगांव गावात ग्रामपंचायत स्थापना करण्यात आली. त्यावेळी शाहूकालीन जकात नाका, छत्रपती शाहू महाराज हंगामी निवासस्थान, कलेच्या क्षेत्रातील अग्रेसर म्हणून उदगावची ओळख आहे. २०१० साली सुमारे ३० लाख खर्चून सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले. औद्योगिक वसाहत, नळपाणी, घरफाळा कराच्या माध्यमातून चांगला महसूल ग्रामपंचायतीला मिळतो.
१९७४ साली गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात होती. त्यावेळी उदगावच्या पहिल्या महिला सरपंच चित्राबाई देसाई यांच्या प्रयत्नातून कृष्णा नदीपात्रातून पहिली नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाली.
आजही या पाणीपुरवठ्यातूनच उदगावला पाणीपुरवठा होतो. तर नवीन पेयजल योजना प्रस्तावित आहे. अशा ९० वर्षांचा कालखंड असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत वर्धापनदिनाचा विसर पडलेला दिसत आहे. सोमवारी १ मे रोजी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कोणत्याच कार्यक्रमाचे आयोजन नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रबोधनाची गरज
शिरोळ तालुक्यातील अग्रेसर म्हणून उदगांवची ओळख आहे. नव्वदी पार करून आणखी दहा वर्षांत शतकमहोत्सवी ग्रामपंचायत म्हणून नामोल्लेख होणार आहे.
उदगांव ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांची नुकतीच मासिक सभा झाली. यामध्ये वर्धापनदिनाविषयी कोणतीच चर्चा झाली नाही.
त्यामुळे सोमवारी (दि.१मे) ग्रामपंचायतीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजन्याची गरज आहे.
असे आहे उदगांव...
१ मे १९२७ रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे. उदगांवचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने छत्रपती शाहू महाराजांनी पर्यायी बाजारपेठ म्हणून जयसिंगपूर शहर वसवून नगरपालिका स्थापन केली. उदगांव येथील काळम्मावाडी वसाहतीत स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावित आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, उदगांवच्या विकासाला आजही पूर्ण क्षमतेने चालना मिळाली नाही. सध्याच्या लोकसंख्येच्यादृष्टीने नगरपंचायत किंवा नगरपालिका शासनाच्या नियमानुसार स्थापन होऊ शकते.