उदगांवमध्ये स्वाभिमानीचे ७० हजार लिटर दूध संकलन बंद
By Admin | Updated: June 1, 2017 15:58 IST2017-06-01T15:58:24+5:302017-06-01T15:58:24+5:30
शेतकरी संपाला पाठिंबा : राजू शेट्टीचे पाऊल

उदगांवमध्ये स्वाभिमानीचे ७० हजार लिटर दूध संकलन बंद
आॅनलाईन लोकमत
उदगांव (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), दि. 0१ : राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी उदगाव येथील स्वाभिमानी दुध संघाचे दुध संकलन गुरूवार पासून बंद ठेवले आहे. एकूण ७० हजार लिटर दूध संकलन बंद राहिल्याचा फटका दुध उत्पादकांसह खरेदीदारांना बसणार आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राज्यातून त्याला सर्व शेतकऱ्यांसह विविध संघटनांतून पाठिंबा मिळत आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी उदगांव येथील स्वाभिमानी दुध संघाने संकलन बंद केले आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील सुमारे ६०० हून अधिक दुध डेअरी बंद असून ७० हजार लिटर दुध संकलन बंद आहे. याचा फटका दुध उत्पादकांसह खरेदी दारांना बसणार आहे.
रस घाना बंद
निमशिरगाव येथील उसाचा रस व्यवसायिकनी रस घाना बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.
आजपर्यंतच्या इतिहासात शेतकरी कधीही संपावर गेला नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेल्या संस्था चालकांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्यास लवकरच सातबारा कोरा होईल. यासाठी स्वाभिमानी दुध संघाने दुध संकलन केंद्र बंद केले असून अन्य संस्थांनी आपला पाठिंबा जाहीर करावा.
- सावकर मादनाईक,
माजी बांधकाम सभापती, उदगांव