शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही - बानगुडे पाटील; कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:15 IST

सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले

चंदगड : सत्तेच्या सारीपाटात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो. महायुती सरकारने बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली; मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे. त्यामुळे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाझर फुटणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. येथील रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ करून ते बोलत होते.यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रियाज शमनजी, राजू रेडेकर, विष्णू गावडे, महेश पाटील, महादेव गुरव, शांता जाधव उपस्थित होते.पाटील म्हणाले, सहा महिन्यांत ७६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत शेतकऱ्यांची जाण नसणाऱ्या अशा या सरकारला या दिंडीच्या माध्यमातून जाग आणण्याची गरज आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी सरकारला जाग आणण्यासाठी ही दिंडीची मशाल पेटविल्याचे सांगितले.आम्ही गप्प बसणार नाहीशेतकरी भरडला जात असताना कृषिमंत्री मात्र रमी खेळण्यात गुंततात ही बाब दुर्दैवी आहे. शेतकरी कर्जमाफीऐवजी हे सरकार शक्तिपीठ महामार्ग करण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून हा उद्योग हे सरकार करत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नसल्याचा इशारा जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी दिला. तत्पूर्वी दिंडी रथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून रवळनाथला साकडे घालून कर्जमुक्तीची सद्बुद्धी सरकारला येवो असे मागणे घालण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून आणली.