Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरे उद्या जिल्हा दौऱ्यावर, तोफा धडाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:43 IST2019-10-14T18:41:37+5:302019-10-14T18:43:50+5:30
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. शिरोळ, चंदगड, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांत प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरे उद्या जिल्हा दौऱ्यावर, तोफा धडाडणार
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. शिरोळ, चंदगड, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांत प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेला शिवसेनेचे उमेदवार उपस्थित असले तरी पक्षाचा एकही झेंडा नव्हता. यावरून झालेल्या युतीतील बेबनावावर ते काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव ठाकरे हे मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर असून, ते शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. त्यामध्ये शिरोळचे शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दुपारी २ वाजता शिवाजी तख्त (ता. शिरोळ) येथे, त्यानंतर ३ वाजता चंदगडचे शिवसेनेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांच्या प्रचारासाठी हलकर्णी फाटा (ता. चंदगड)मध्ये, दुपारी ४ वाजता शाहूवाडीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या प्रचारासाठी छ. शिवाजी महाराज महाविद्यालय पटांगण, सरूड (ता. शाहूवाडी) येथे, तर सायंकाळी ६ वाजता कोल्हापूर शहरात उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी पेटाळा (शिवाजी पेठ) येथे सभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचा मुक्काम राहणार असून, दुसºया दिवशी सकाळी ते कोकणकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, सभांच्या तयारीसाठी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांनी तयारीसंदर्भातील माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.