शिरोळ (जि. कोल्हापूर) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, जर नांदायचे नसेल तर सत्तेतून वेगळे व्हा; पण ते विरोधी पक्षाचे काम करण्याऐवजी दुस-याचा संसार केव्हा मोडतोय आणि आपला नंबर कधी लागतोय याचीच वाट पाहत आहेत. त्यांना वाटतंय म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.शिरोळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या व्यथा व वेदना दूर करण्यासाठी शिवसेना एकहाती कार्यक्रम घेत आहे. जनतेला न्याय देण्याची भूमिका हे सरकार घेत नाही. त्यामुळे सरकारवर कडाडून टीका करावी लागत आहे.शिरोळ तालुक्यात आल्यानंतर जिवाभावाची माणसे भेटली. शिवसेनेला यश देणारा हा जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा भगवी लाट निर्माण झाली आहे यामुळे निश्चितच उद्या शिवसेनेचे सरकार येणार आहे.
पवार दुस-याचा संसार केव्हा मोडतोय याची वाट बघताहेत, उद्धव ठाकरे यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:01 IST