शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंकडून २०१८ लाच लोकशाहीची विटंबना, मंत्री दीपक केसरकर यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:17 IST

बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोय

कोल्हापूर : लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळा काढणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी २०१८ साली शिवसेनेच्या घटनेत दुरूस्ती करून सर्व नियुक्तीचे अधिकार स्वत:कडे घेतले. ती लोकशाहीला धरून नव्हती. ही दुरूस्ती त्यांना अंगलट येणार असल्याने निवडणूक आयोगालाही पाठवली नाही. त्यामुळे ठाकरे यांनीच त्यावेळी लोकशाहीची विटंबना केली, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केला.निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यावेळी उपस्थित होते. म्हणाले, निवडणूक आयोगाचा निकाल मी वाचला आहे. आयोगाने याबाबत निर्णय घेऊ नये म्हणून ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. परंतु, विविध प्रकरणांचा अभ्यास करून हा निर्णय दिला गेला. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी सध्या राज्यभर शिव्याशाप देत दौरे काढले जात आहेत. आम्ही केवळ बाळासाहेबांच्या विचारांवर चालायचे म्हणून आम्ही आमदार आणि मंत्रिपदे पणाला लावली.२०१८ची ही लोकशाहीविरोधी पक्षाची घटनादुरूस्ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाईल तेव्हा हे पूर्ण उघडे पडतील. तुम्ही स्वत: लोकशाही मानत नाही आणि लोकशाहीची भाषा करता. हे तुम्हाला शोभत नाही.

बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोयउध्दव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून त्यांच्या उलट बोलत नाही, तर आदित्य हे बाळासाहेबांचे नातू आहेत म्हणून त्यांना सोडतोय. त्यांच्यापेक्षाही वाईट पण योग्य आम्ही बोलू शकतो. त्यामुळे आदित्य यांनी खोटे बोलत फिरायचे बंद करावे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी बजावले.इतिहासात पहिल्यांदाचवडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. ही चूक त्यांना कोणी करायला लावली, हे माहिती नाही. परंतु यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये याचा चुकीचा संदेश गेला, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना