शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: 'उत्तर' विधानसभा आमचे नाक, लढवणार; शिवसेना कार्यकर्त्यांनी काँग्रेसला ठणकावले, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 18:04 IST

संजय पवार इच्छुक, पण..

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आठ वेळा लढवला आहे. या मतदारसंघात आमची ताकद असतानाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचा मान राखण्यासाठी शिवसेनेने तो मतदारसंघ काँग्रेसला खुल्या दिलाने दिला. उत्तर विधानसभा मतदारसंघ तर आमचे नाक आहे. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघात जास्त लक्ष घालू नये, तो मतदारसंघ आम्हीच लढवणार या शब्दांत शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेसला ठणकावले. संजय पवार, रविकिरण इंगवले, प्रज्ञा उत्तुरे यांनी आपण लढण्यास तयार असल्याचे जाहीर करून टाकले.शाहू स्मारकच्या मिनी सभागृहात उद्धवसेनेच्या उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच्या पालख्या वाहून खांदा दुखायला लागला, आता पक्षाचाच कार्यकर्ता पालखीत बसवूया असे सांगत उत्तर विधानसभा मतदारसंघावर ठामपणे दावा सांगितला. शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, प्रज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे उपस्थित हाेते.संजय पवार म्हणाले, लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसैनिकांनी काँग्रेसचे शाहू छत्रपती यांच्यासाठी जीवाचे रान केले. उत्तर विधानसभा मतदारसंघ तर आमचाच आहे. ही जागा पाचवेळा आम्ही जिंकली आहे. त्यामुळे काँग्रेसने मोठ्या मनाने या जागेवरचा दावा सोडून ती शिवसेनेला द्यावी.विजय देवणे म्हणाले, मोठ्या मनाने आम्ही तुम्हाला लोकसभेची जागा दिली. त्यामुळे काँग्रेसनेही त्याच मनाने आमचा उत्तर विधानसभा मतदारसंघ आम्हाला द्यावा. उत्तरमध्ये ज्यांनी गद्दारी केली. त्यांना गाडण्यासाठी त्याच मातीतला पैलवान हवा. त्यामुळे उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनाच लढवेल. रविकिरण इंगवले म्हणाले, पालखी उचलून उचलून खांदा दुखायला लागला. त्यामुळे आता आपलाच कार्यकर्ता त्या पालखीत बसवूया. यावेळी उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असा ठराव करण्यात आला.

मी इच्छुक; पण पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम मानणारया मेळाव्यात संजय पवार यांनी उत्तरमधून लढण्यास मी इच्छुक असल्याचे जाहीर केले. गेल्या साडेतीन दशकांपासून काम करतोय. अनेकवेळा संधी जवळून गेली. त्यामुळे आता संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याचा नेटाने प्रचार करणार असल्याचेही पवार म्हणाले. अवधूत साळोखे म्हणाले, करवीर, उत्तर आणि आणि दक्षिण हे मतदारसंघ दुसऱ्या पक्षांना गेले तर आम्ही काय करायचे. उत्तरसाठी दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा बळी नको. तेथील कार्यकर्त्यांनाही ताकद द्यायला हवी.

परस्पर कार्यक्रम ठरवू नकारविकिरण इंगवले यांनी या मेळाव्याच्या कार्यक्रमाची कल्पना दिली नसल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर संजय पवार यांनी ही कुरबुरीची वेळ नाही. मात्र, तुम्हीही परस्पर कार्यक्रम ठरवू नका, त्याची माहिती पक्षालाही द्या, असा टोला लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस