शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:07 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम

कोल्हापूर : जिल्हाप्रमुख निवडीवरून उद्धवसेनेत उपनेते संजय पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या समर्थकांचे पुनर्वसन करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ‘कोल्हापूर दक्षिण व करवीर’ विधानसभेचे दुसरे जिल्हाप्रमुख पद निर्माण करून या ठिकाणी विराज पाटील किंवा राजू यादव यांच्यापैकी एकाला संधी देत असताना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अवधूत साळाेखे यांच्यावर शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.जिल्हाप्रमुख पदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती केल्यानंतर उपनेते संजय पवार यांनी त्यास विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत बंडाळी पक्षाला महागात पडू शकते. यासाठी पक्ष नेतृत्वाने यावर काय तोडगा काढता येईल, याची चाचपणी सुरू केली आहे.उद्धवसेनेते सध्या रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे, संजय चौगले, वैभव उगले हे चार जिल्हाप्रमुख आहेत. यामध्ये आणखी एक जिल्हाप्रमुख पद निर्माण करून तिथे पवार समर्थकांची वर्णी लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख म्हणून अवधूत साळाेखे, तर राज्य संघटक म्हणून पद निर्माण करून त्याठिकाणी नावीज मुल्ला यांची नियुक्ती करण्याची खेळी पक्षाकडून खेळली जाऊ शकते.

पदांचा हा फार्म्युला कोणी दिला हे मला माहिती नाही, पण प्रस्ताव चांगला आहे. तसे केले तर वाद संपण्यास मदत होईल. - विराज पाटील