शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; संजय पवारांनी दिला उपनेते पदाचा राजीनामा, भूमिका जाहीर करताना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:41 IST

शेवटच्या श्वासापर्यंत ‘मातोश्री’चा सेवक म्हणून काम करणार : राजीनामा मागे घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह

कोल्हापूर : उद्धवसेनेचे उपनेते, माजी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणूकीपासून जिल्हाप्रमुख नेमणूकीपर्यंत पक्षाने विश्वासात घेतले नसल्याने राजीनामा देत असलो तरी गेली ३६ वर्षे ‘मातोश्री‘वर श्रध्दा ठेवून काम केले आणि येथून पुढे शेवटचा श्वास असेपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.उद्धवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक होते. संजय पवार यांनी इच्छुकांची नावे पक्षप्रमुखांना अनेक वेळा पाठवली होती. पण, शुक्रवारी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचे नाव जाहीर केल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला. त्यातून युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला. तर, उपनेते संजय पवार यांनी सोमवारी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.त्यानुसार सोमवारी, शासकीय विश्रामगृहावर उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, यामध्ये त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी, राजीनामा देऊ नका, तुम्ही देणार असाल तर सगळेच राजीनामा देतो असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. पण, ते राजीनाम्यावर ठाम राहिले.

पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, अवधूत साळोखे, विराज पाटील, माजी जिल्हा प्रमुख रवि चौगुले, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तूरे, राजू यादव, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते.

पवार यांना अश्रू अनावरगेली ३६ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पवार यांची ओळख आहे. पक्षातून सातत्याने होत असलेल्या अवहेलनेमुळे ते काहीसे अस्वस्थ हाेते. पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

पक्षाने खूप दिले...

सामान्य शिवसैनिक ते उपनेते पद देत असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे उपाध्यक्षपद, राज्यसभेची उमेदवारी देऊन सन्मान केला. पक्षाने आपणाला खूप दिले, पण ज्या पध्दतीने निर्णय घेताना पक्षाकडून वागणूक मिळते, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.